अहमदनगर (प्रतिनिधी) – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर प्रत्येकाच्या मनामनात कायम सुरु राहावा या हेतूने नगरची युवा शिवव्याख्याती कु. प्रणाली बाबासाहेब कडुस हिने सुरु केलेला नगरच्या जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची दर रविवारी साफसफाई, नित्यपूजा उपक्रमास दिवसेंदिवस शिवभक्तांचा प्रतिसाद वाढत असून पुण्यातील शिवभक्तांनीही या महापूजेस उपस्थिती लावली.
विश्व हिंदु मराठा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून युवा शिवव्याख्याती कु.प्रणाली कडुस हिने सुरु केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची दर रविवारी साफसफाई,नित्यपूजा उपक्रमातील पाचव्या पूजेला पुणे येथील विश्व हिंदु मराठा संघ महाराष्ट्र राज्यचे विजय जगताप, भूषण वर्पे, करण वाकोडे, आयुष शिवेकर, अनिकेत दहिभाते, ऋत्विक मानकर हे उपस्थित होते.
याशिवाय अशोक गटकळ, अॅड. अरुण पवार, शिवव्याख्याते अविनाश गव्हाणे, कृष्णा राऊत ,अजित पवार ,महेश आनंदकर, डॉ. बाबासाहेब कडुस, स्वाती कडूस, वैभव शेळके ,साक्षी अलवने ,दिपाली कडूस, विनायक डांगे, भांड साहेब, प्रशांत दरंदले ,सुनील कोळगे, योगिता कोळगे हे ही यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी पहाटेपासूनच प्रणाली कडूस सह बाल शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसराची स्वच्छता करून आकर्षक रांगोळी तसेच फुलांची सजावट केली.त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीस पुष्पहार अर्पण करत, महाराजांचा जयघोष करत महाआरती करण्यात आली.
या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती यापुढे दर रविवारी नित्यनियमाने सुरु राहणार असून या उपक्रमात जास्तीत जास्त शिवभक्तांनी पुढील रविवारी सहभागी व्हावे असे आवाहन शिवव्याख्याती कु. प्रणाली कडुस हिने केले.