नगरसेवक अनिल शिंदे यांच्या प्रयत्नातून कल्याण रोड परिसरातील विद्या टार्वर येथे ड्रेनेजलाइन कामाचा शुभारंभ

0
73

कल्याण रोड परिसर विकसित भाग म्हणून ओळखला जाईल – नगरसेवक अनिल शिंदे

अहमदनगर प्रतिनिधी : शहरातील कल्याण रोड परिसर हा झपाट्याने विकसित होणाऱ्या भाग आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दररोज नागरी वसाहती निर्माण होत आहे. या भागाच्या मूलभूत प्रश्नापासून विकास कामे करावी लागत आहे. हे कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये. यासाठी नियोजन पूर्व विकास आराखडा तयार केला असून जमिनी अंतर्गत कामे मार्गी लावण्याचे काम सुरु आहे.

या भागाचा ड्रेनेज लाईनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार. या भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट असून हा ही प्रश्नही मार्गी लागाणार आहे. गणेश नगर येथील पाण्याचा टाकी खालील संपवेल चे काम सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर या भागाला फेज टू पाणी योजनेअंतर्गत पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे आणि अनेक वर्षाचा पिण्याचे पाण्याचे प्रश्‍न सुटणार आहे. कल्याण रोड परिसर हा भविष्य काळात शहराचा विकसित परिसर म्हणून ओळखला जाणार असल्याचे प्रतिपादन नगरसेवक अनिल शिंदे यांनी केले.

प्रभाग क्रमांक 15 चे नगरसेवक अनिल शिंदे यांच्या प्रयत्नातून विद्या टार्वर परिसरातील ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी ताई शेंडगे यांच्या हस्ते संपन्न झाला.

समवेत माजी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेविका सुवर्णा ताई जाधव, नगरसेवक प्रशांत गायकवाड, पारूनाथ ढोकळे, सुनील घाडगे, संजय सागावकर, महेंद्र मैड, जयसिंग नरवडे, योगेश ढेरे, रवि मैड, सुरेंद्र बोऱ्हाडे, भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब भापकर, संजय साठे, बाळासाहेब ढेरे, सुजित काळे, भास्कर महांडुळे, गजानन गटणे, भिवा साबळे, साजिद शेख, आदम शेख, गणेश ढेरे,अलका ढेरे, प्रतिभा कोल्हे, विद्या सरडे,सुनंदा गटने, आशा ढेरे, सविता घोरपडे, नंदनी नरवडे, सिंधु गीते, शशिकला ठोंबरे, शारदा वाघ, बाळासाहेब ठोंबरे, हिरामण गुंड, कैलास शिंदे, विक्रम जागीरदार, मच्छिंद्र साळवे, राजेंद्र सोनी, छाया शिंदे, ठेकेदार आनंद पुंड आदी उपस्थित होते.

संभाजी कदम म्हणाले की, प्रभाग 8 व 15 मध्ये एकच विचारायचे आठवी नगरसेवक नागरिकांनी शिवसेनेचे निवडून दिले आहे.त्यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळाली आहे महापौर रोहिणीताई शेंडगे व नगरसेवक अनिल शिंदे या भागाचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे या भागाच्या विकासाला मोठा निधी लवकरात लवकर प्राप्त करून देतील.महापौर रोहिणी ताई शेंडगे यांच्या प्रयत्नातून शहराचा पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच पथदिवे बसविण्याच्या कामाचा सुरुवात होणार असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here