भाजपाने शहर विकासाच्या प्रश्नाला गती दिली : माजी महापौर बाबासाहेब वाकळे
अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी
अहमदनगर महानगरपालिकेमध्ये गेली अडीच वर्षे मध्ये भाजपाची सत्ता होती. या काळामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या विविध प्रलंबित योजनांच्या कामांना गती देण्याचे काम केले आहे. सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे प्रश्न मार्गी लावले आहे. अमृत पाणी योजना, गटार योजना अनेक वर्षापासून प्रलंबित फेस 2 पाणी योजना मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला त्यामुळे या योजना अंतिम टप्प्यात आले आहे.
त्यामुळे लवकर शहराचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. नगरसेवक रामदास आंधळे यांच्या प्रयत्नातून उपनगरांमध्ये विविध विकास कामे मंजुर केली आहेत. ती कामे आता सुरू झाले आहेत शहरातील विविध रस्त्यांची कामे मंजूर असून पाऊस उघडल्यानंतर ही कामे सुरू होणार असल्याचे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
नगरसेवक रामदास आंधळे यांच्या प्रयत्नातून गुलमोहर रोड पोलिस चौकी परिसराचे सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपाचे शहर जिल्हा अध्यक्ष महेंद्र भैया गंधे, नगरसेवक रवींद्र बास्कर, अॅड विवक नाईक, अभिजीत चीप्पा, राहुल आंधळे, कुमार नवले, बापू जानवे, अमोल आंधळे, विशाल साबळे, तुषार महानूर, अविराज डोंगरे, सचिन कजबे, अक्षय सोनवणे, नितीन भाकरे, सागर उकिरडे, कौशिक भानुशे, साहिल शेख, आकाश सोनवणे, आदी उपस्थित होते.
भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भैया गंधे म्हणाले की शहरांमध्ये विकासाची कामे सुरू असताना दर्जेदार कामाकडे प्रशासन व नागरिकांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.जेणेकरून विकासाचे झालेले काम पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.या माध्यमातून नागरिकांच्या पैशाचा अपव्य होणार नाही. दर्जेदार विकासाकडे लक्ष केंद्रित करावे असे ते म्हणाले.
नगरसेवक रामदास आंदळे म्हणाले की नगरसेवक पदाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न सोडवत आहे. गुलमोहर रोड पोलिस चौकी परिसराचे सुशोभीकरण करणे गरजेचे आहे. या माध्यमातून चौकाच्या सुंदर भर पडेल.यापुढील काळातही विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे. असे ते म्हणाले