नगर जिल्हा ‘वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन’ संघटनेच्यावतीने डॉक्टरांचा सन्मान

0
95

साई एशियन हॉस्पिटलचे कोविड काळातील कार्य कौतुकास्पद

लसीकरणाबाबत कुठल्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये – डॉ.सचिन पांडुळे

अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी

कोविड चा काळ हा दुःख व वेदना देणारा ठरला आहे या काळामध्ये साई एशियन हॉस्पिटल च्या माध्यमातून कोविड रुग्णांना मानसिक आधार बरोबर उपचार देण्याचे काम केले आहे. अतिगंभीर रुग्णांना योग्य उपचार हॉस्पिटलने दिल्याने ते बरे होऊन मोठ्या आनंदाने आपल्या घरी गेली त्याचा मनुष्य आनंद आम्हाला होत आहे.कोविडचा विषाणू नवीन रूप धारण करत आहे. त्याला रोखण्यासाठी नवनवीन औषधे उपचारासाठी उपलब्ध झाली आहे. या विषाणूला रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे यासाठी नागरिकांनी पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे लसीकरणाबाबत कुठल्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे प्रतिपादन डॉ.सचिन पांडुळे यांनी व्यक्त केले.

साई एशियन हॉस्पिटलने कोविड काळात चांगले कार्य केल्याबद्दल नगर जिल्हा मराठा ऑर्गनायझेशन संघटनेच्यावतीने हॉस्पिटल मधील डॉ.सचिन पांडुळे पाटील,डॉ.जगदीश पाटील,डॉ.नितीन नागरगोजे यांचा सत्कार करताना संघटनेचे प्रवीण थोरात,अभिजीत शेळके,संकेत नरसाळे,अनिकेत आवारे,अजय थोरात,विशाल सुपेकर, चेतन वाळुंजकर,गणेश अकोलकर, हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद पंडित,जनसंपर्क अधिकारी संपत पंडित आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संघटनेचे अनिकेत आवारे म्हणले की,साई एशियन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कोरोना काळात मोठे योगदान आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये आम्ही काम करत असताना डॉ.सचिन पांडुळे यांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकीतून रुग्णसेवा केली आहे त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे.कोविड काळात गोरगरीब रुग्णांनवर अल्पशा दरात उपचार केले तसेच कोविड काळात दिलेल्या योगदानाबद्दल आज ‘वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन’ संघटनेच्यावतीने सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here