नगर जिल्ह्यात नवीन निर्बंध लागू… 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर : जिल्हा कार्यक्षेत्रात खोलीबाहेर 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी सरकारच्या निर्देशानुसार नवीन प्रतिबंधक आदेश जारी केले आहेत.

1. कोविड अनुरुप वर्तनाचे पालन :

राज्य शासनाने व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे, सेवाप्रदाते, परिवास्तूंचे (जागांचे) मालक, परवानाधारक, आयोजक, इत्यादींसह सर्वानी तसेच सर्व अभ्यागत, सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी, इत्यादींनी काटेकोर पालन केले पाहिजे. कोविड अनुरूप वर्तनाची तपशीलवार मार्गदर्शकतत्वे तसेच त्यांचे उल्लंघन केल्यास करावयाचे दंड, कोविड अनुरूप वर्तनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आणि यात यापुढे नमूद केलेल्या दंडांनुसार असेल.

2) संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता :

अ. तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या, कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (जसे की,खेळाडू. अभिनेते. इत्यादी), अभ्यागत, पाहणे, ग्राहक यांचे, यात यापुढे दिलेल्या व्याख्येनुसार, संपूर्ण लसीकरण केलेले असावे

ब. जेथे जनतेतील कोणत्याही व्यक्तींना येण्याचा आणि सेवा घेण्याचा हक्क आहे असे कोणतेही दुकान,आस्थापना, मॉल, समारंभ. संमेलन (मेळावे), इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीदवारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत. ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे

क. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये. संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल.

इ. राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org किंवा telegramMahalGov UniversalPass Bot) हा, संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथा.

छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले कोविन प्रमाणपत्र देखील त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल.

18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी. इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायीकाकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल.

इ. जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी त्या खुल्या असण्याची शर्तनसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.

3. महाराष्ट्र राज्यात प्रवास :

कोणत्याही आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानावस्न राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे. या बाबतीतील भारतसरकारच्या निदेशांद्वारे विनियमन करण्यात येईल.

4. कोणताही कार्यक्रम, समारंभ, इत्यादींमधील उपस्थितीवरील निबंध :

अ. चित्रपट गृह, नाट्यगृह, मंगलकार्यालय, सभागृह, इत्यादी बंदिस्त/बंद जागेत घेण्यात येणा-या कोणत्याही कार्यक्रमाच्या/समारंभाच्या। उपक्रमाच्या बाबतीत, जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल.

ब. संपूर्ण खुल्या असलेल्या जागांच्या बाबतीत, कोणत्याही समारंभांसाठी किंवा संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता, औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर (स्टेडियम

प्रमाणे), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास, अशी क्षमता ठरवण्याचा अधिकार असेल.

क. जर वरील नियमांनुसार कोणत्याही संमेलनासाठी (मेळाव्यासाठी) उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या 1 हजारांपेक्षा अधिक असेल तर, अशा बाबतीत, स्थानिक तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक यांना त्याची माहिती द्यावी लागेल आणि तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक, अशा कोणत्याही संमेलनाचे (मेळाव्याचे) निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण स्वतः करतील किंवा त्यांचे प्रतिनिधी पाठवतील आणि तेथे वर नमूद केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील. कोविड-19च्या प्रसाराचा धोका लक्षात घेता, तेथे कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर,तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक, यांना कार्यक्रम पूर्णत: किंवा अंशत: बंद करण्याचे आदेश देण्याचा प्राधिकार असेल.

5. जिन्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे इतर वाजवी निबंध :

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास, जर योग्य वाटल्यास, जाहीर नोटीसीद्वारे ४८ तासांची पूर्वसूचना देऊन कोणत्याही क्षणी. उपरोक्त नमूद केलेले निबंध व शर्ती वाढविता येतील.

6. संपूर्ण लसीकरणाची व्याख्या :

संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ,लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर 14 दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे किंवा ज्या व्यक्तीचे वैद्यकीय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही

आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टरांकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे किंवा 18 वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती, असा आहे.

7. कोविड अनुरुप वर्तनविषयक नियम व दंड :

1.कोविड 19 विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यामुळे त्याच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व संस्थेने पालन करण्याची गरज असलेले दैनंदिन सामान्य वर्तन अशी कोविड अनुरूप वर्तन या संज्ञेची व्याख्या करता येऊ शकेल. ज्यांचे काविड अनुरूप वर्तन म्हणून वर्णन केले जाते आशा वर्तनाच्या पैलूंमध्ये, खाली नमूद केलेल्या वर्तनांचा समावेश होतो आणि कोविड 19 विषाणूचा प्रसार होण्यास जे अडथळा निर्माण करू शकतील अशा सर्व तर्कसंगत पैलूंचा देखील समावेश होतो, त्यात नमूद केलेली त्याच्या प्रसाराची कार्यपद्धती दिलेली आहे.

2.मूलभूत कोविड अनुरूप वर्तनाचे काही पैलू पुढीलप्रमाणे असून त्यांचे प्रत्येकाने सदैव पालन केले पाहिजे. सर्व संस्थांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांच्या परिसरांत भेट देणारे अभ्यागत, ग्राहक किंवा संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, सहभागी होणारी कोणीतीही व्यक्ती, त्याचे पालन करतील आणि त्यांच्या परिसरांमध्ये आणि किंवा व्यवसायाशी संबंधित व्यवहार करताना किंवा संबंधित संस्थेशी संबंधित असलेली अन्य कार्य करताना, त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता संस्था उत्तरदायी असतील. संस्था, त्यांच्या नियंत्रणाखाली किंवा जेथे ती संस्था आपला व्यवहार किंवा इतर कार्य करत असेल अशा सर्व ठिकाणी, अशा सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या हॅन्ड सॅनिटायझर, साबण व पाणी, तापमापक, इत्यादी गोष्टी उपलब्ध करण्यासाठी देखील जबाबदार आहेत.

3) साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा,

4) साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक/डोळे/तोंड यांना स्पर्श करणे टाळा.

5) योग्य श्वसन स्वच्छता (आरोग्य) राखा.

6) पृष्ठभाग नियमितपणे आणि वारंवार स्वच्छ व निजतुक करा,

7) खोकताना किंवा शिंकताना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्य पेपर नष्ट करा: जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वतःचा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपर नाका तोडांवर ठेवून खोकावे व शिकावे.

8) सार्वजनिक ठिकाणी थुकू नका.

१) सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (6 फूट अंतर) राखा,

10) कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार अभिवादन करा.

11) कोविड-19 विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेले अन्य कोणतेही तर्कसंगत वर्तन.

• ज्यांनी, आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादींवर कोविड अनुरूप वर्तन लादणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परिवास्तूत (जागेत), जर एखाद्या व्यक्तीने कसर केल्याचे  आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त, अशा संस्थांना किंवा आस्थापनांना सुध्दा रुपये 10,000/- इतका दंड करण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादींमध्ये कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने, स्वतःच कोविड अनुरूप वर्तनाचे (CAB) किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपद्धतीचे पालन करण्यात कसूर केली तर, ती, प्रत्येक प्रसंगी, रूपये 50,000/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना, रूपये 500/- इतका दंड करण्यात येईल, तसेच सेवा पुरविणारे वाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रूपये 500/- इतका दंड करण्यात येईल.बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजंन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये 10,000/- इतका दंड करण्यात येईल, वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असे पर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.

• कोविड अनुरूप वर्तणुकी संबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे, अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास, वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे, उल्लंघन करणा-यांवर इतर कोणताही दंड किंवा शास्ती लादता येईल.

कोविड अनुरूप वर्तनाचे नियम/धोरणे वरील प्रमाणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोविड अनुरुप वर्तनाशी संबंधित असणारे इतर कोणतेही विषयामुद्दे, राज्य शासनाध्या अंमलात असलेल्या प्रचलित नियमांनुसार/आदेशानुसार असतील.

कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन न केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 व साथरोग अधिनियम, 1897 मधील तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता च्या कलम 188 नसार दंडनीय कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!