दौंड व नगर येथे बैठक घेऊन डी.पी.आर तयार करण्याच्या दिल्या सूचना – खा.डॉ.सुजय विखे पाटील
अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी
नगर शहर व जिल्ह्यातील युवक व नागरिकांना शिक्षण,नोकरी व व्यवसायिकांना स्वस्त व कमी वेळेत नगर-पुणे प्रवास करता यावा यासाठी आज मी दौंड ते नगर हा रेल्वे प्रवास करून रेल्वे प्रशासनाकडून माहिती घेतली असून पुढील पंधरा दिवसात सदर अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन अहवाल सादर केला जाईल व लवकरच नगर ते पुणे रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे अशी माहिती खासदार डॉ.सुजय विखे यांनी पाहणी दरम्यान दिली.
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दौंड ते नगर रेल्वे प्रवास करून नगर रेल्वे स्थानकावर दाखल झाले असता यांचे स्वागत करताना नगरसेवक मनोज कोतकर, ॲड.धनंजय जाधव,नगरसेवक राहुल कांबळे,रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य हर्जितसिंह वधवा,अशोक कानडे,अमित गटणे,सुरज कुरलीये आदी उपस्थित होते.
खा.सुजय विखे पाटील म्हणाले की, नगर-पुणे रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर शहरातील व जिल्ह्यातील युवक, नागरिक दररोज प्रवास करू शकतात यासाठी डेली व मासिक पास सुरू करणार आहे.नगर मधून पुणे येथे जाण्यासाठी अवघ्या दोन तासाचा कालावधी लागणार आहे.केंद्र सरकारने दौंड येथे तीस कोटी रुपये खर्च करून कोल्ड लाईन स्टेशन उभारले आहे.ही रेल्वे सुविधा सुरु झाल्यानंतर नगरकरांना वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही याच बरोबर सुखकारक प्रवास होऊन नागरिकांची आर्थिक बचत होईल असे ते म्हणाले.
यावेळी नगर रेल्वे स्थानक व्यवस्थापक एन.पी.तोमर, आर.एस.मीना हे अधिकारी उपस्थित होते.