नगर मध्ये ऑफलाईन रेशन कार्ड मिळावे – बाळासाहेब बोराटे

- Advertisement -

नगर मध्ये ऑफलाईन रेशन कार्ड मिळावे – बाळासाहेब बोराटे

नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचे ना.छगन भुजबळ यांना निवेदन

नगर  –  अहमदनगर शहरातील नागरिकांना ऑफलाईन रेशन कार्ड मिळावेत, या अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी निवेदनाद्वारे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्याकडे केली.

ना.छगनराव भुजबळ यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना नगर शहरातील अन्न-धान्य वितरण कार्यालयात रेशन कार्डबाबतचे कामे असतात. परंतु संबंधित कार्यालयाकडून ऑनलाईन पद्धतीने सेतूमधून रेशन कार्ड काढण्यास सांगण्यात येते. ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड मिळण्यासाठी सेतू कार्यालयातून दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो.

सदरील रेशन कार्ड शैक्षणिक तसेच महात्मा फुले योजनेकामी मूळ रेशन कार्डची आवश्यकता असते. परंतु नगर कार्यालयातून सध्या रेशन कार्ड ऑफलाईन पद्धतीने दिले जात नाही. कार्यालयात चौकशी केली असता अधिकारी ऑनलाईन अर्ज करण्यास सांगतात. ऑनलाईन अर्ज केल्यास शासकीय सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगितले जाते.  त्यामुळे रेशन कार्ड मिळण्यास बराच कलावधी लागत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप व गैरसोय होत आहे.

सध्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याअसून, रेशन कार्ड मिळत नसल्याने विद्यार्थी शिक्षण, शिष्यवृत्ती व शासकीय योजनांपासून वंचित राहत असून, त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच शहरातील घटस्फोटीत, आजार पिडीत, संजय गांधी,  श्रावण बाळ योजनेकामे रेशन कार्डची आवश्यकता असते.  सदरील नगर शहर वगळता इतर तालुक्याच्या ठिकाणी नवीन व दुबार रेशन कार्ड ऑफलाईन पद्धतीने मिळत असून, तरी नगर शहरामध्ये नागरिकांची गैरसोय व शैक्षणिक नुकसान टाकण्याकाम आपले स्थावर ऑफलाईन रेशनकार्ड योग्य तो निर्णय व्हावा, असे निवेदनातून म्हटले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles