विनायक नगर परिसरामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाची पाहणी उपमहापौर भोसले यांनी केली
अहमदनगर प्रतिनिधी – आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली नियोजन बद्ध शहर विकासाची कामे सुरू आहे ज्या-ज्या भागातील जमिनीअंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे त्याभागामध्ये सुशोभीकरणाचे कामे हाती घेतली आहे.शहराच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने फूटपाथ तयार करून पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे कामे सुरू केली आहेत.

याच बरोबर हरित शहर करण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची कामे देखील हाती घेतली आहे.विनायक नगर भागांमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूस पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम सुरू केले आहे असे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केले.
प्रभाग क्र.१४ मध्ये विनायक नगर परिसरामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाची पाहणी करताना उपमहापौर गणेश भोसले,नगरसेवक प्रकाश भागानगरे,मा.नगरसेवक संजय चोपडा,राजेंद्र गांधी,किशोर श्रीश्रीमाळ,अमित अनेचा,संतोष गुंदेचा,प्रकाश बलडोटा,किशोर गांधी,सतिष देसरडा,संतोष भोसले,नामदेव भोसले,सुनील भोसले,पियुष बलडोटा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गांधी म्हणाले की, प्रभाग क्रमांक १४ मध्ये चारही नगरसेवकांच्या माध्यमातून विकास कामे जोरदार सुरू आहेत, नागरिकांचे मूलभूत प्रश्न मार्गी लावले जात आहे याच बरोबर आता पर्यावरणाचा प्रश्न चारही नगरसेवकांनी मार्गी लावला आहे. प्रभाग क्रमांक १४ ची ओळख हरित प्रभाग म्हणून ओळखला जात आहे असे ते म्हणाले.