नगर शहरातील व्यासायिक इमारतींचे फायर ऑडिट करावे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नगर शहरातील व्यासायिक इमारतींचे फायर ऑडिट करावे

अन्यथा मनसेच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन हाती घेण्यात येईल -किरण रोकडे

नगर  – नगर शहरातील व्यावसायिक इमारतीचे मनपा प्रशासनाने फायर ऑडिट करण्यात यावे, या मागणीचे निवेदन मनसेच्यावतीने मनपा उपायुक्त  यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष किरण प्रशांत रोकडे यांनी दिले. याप्रसंगी वाहतूक सेनेचे विभाग संघटक अमोल गोरे, विभाग अध्यक्ष सनी भुजबळ, उपविभाग अध्यक्ष ओंकार जगदाळे, विशाल भटेजा, मोहित कुलकर्णी, समर्थ मुर्तडक, ऋषी सोनवणे, उदित सूर्यवंशी आदि उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, नुकतेच पत्रकार चौकातील एक व्यावसायिक दुकानाला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने त्यात कुठल्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही. परंतु नगर शहरात आतापर्यंत बर्‍याच आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या घटना टाळण्यासाठी शहरातील सर्व इमारतींचे फायर ऑडिट होणे आवश्यक आहे. मनपा प्रशासनाकडून व्यावसायिक इमारतींचे फायर ऑडिट होत नाही, त्यामुळे अशा घटना घडत आहेत. भविष्यात अशा प्रकारची आग लागून जिवीत हानी होऊ शकते, मनपाने या संदर्भात जर कुठलेही ठोस पाऊल उचलून प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत तर मनसेेचे शहर अध्यक्ष गजेंद्र राशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेत मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!