ध्येय,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते – आ.संग्राम जगताप
अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी
शालेय विद्यार्थी शिक्षण घेत असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या बुद्धी व कौशल्याच्या जोरावर ठसा उमटविला आहे.शिक्षणाबरोबरच आपल्या आवडीच्या कलेकडे वळावे यासाठी ध्येय,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते नगर शहरातील १४ वर्षीय बालक चि.सुजल सचिन लोटके याने १ मिनिटे ४० सेकंदात सात प्रकारे ‘रुबिक क्यूब’ सोडविले आहे त्याच्या यशाची नोंद ‘इंडिया बुक रेकॉर्डमध्ये’ झाली असल्यामुळे नगर शहराच्या दृष्टीने ही अभिमानाची व कौतुकाची बाब आहे.चि.सुजल सचिन लोटके याच्या या यशामुळे नगर शहराचे नाव उंचावले असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
‘इंडिया बुक रेकॉर्ड’ मध्ये नगर शहरातील 14 वर्षीय बालक चि.सुजल लोटके ची नोंद झाल्याबद्दल आ. संग्राम जगताप यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी समवेत नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे,मा.नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार,नगरसेवक सुनील त्रंबके,नगरसेवक समद खान, सचिन जाधव,सचिन लोटके, महेश लोटके,संभाजी पवार,कौस्तुभ पवार, हर्षल विधाते,सागर उजागरे आदी उपस्थित होते.
संपूर्ण भारतभर नुकत्याच झालेल्या ‘रुबिक क्यूब’ स्पर्धेत नगर शहरातील 14 वर्षीय बालक चि.सुजल लोटके याने सहभाग नोंदवला होता. सदरची स्पर्धाही ऑनलाइन पद्धतीने पार पडली,या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून खेळाडू सहभागी झाले होते, या स्पर्धेमध्ये नगरचा खेळाडू सुजल लोटके याने आपल्या बुद्धिमत्तेच्या व कौशल्याच्या जोरावर ही स्पर्धा 1 मिनिटे 40 सेकंद मध्ये पार पाडून सुमारे सात प्रकारचे रुबिक क्यूब सोडविले संपूर्ण भारतामध्ये प्रथमच या रेकॉर्डची नोंद झाली आहे.त्यामुळे सुजल च्या यशाची नोंद ‘इंडिया बुक रेकॉर्डमध्ये’ करण्यात आली त्याच्या या यशाबद्दल संपूर्ण स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.