नगर शहरात लागणार स्मार्ट दिवे आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नाला यश

- Advertisement -

स्मार्ट एलईडी पथदिवे उभारणीसाठी इस्मार्ट एजन्सीला कार्यारंभ आदेश देण्यात आले

अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी

शहराचा महत्वकांशी स्मार्ट एल.इ.डी पथदिवेचा रखडलेला प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे.त्यामुळे अंधाराचे साम्राज्य नाहीसे होऊन नगर शहर प्रकाशमय होणार आहे.बरेच वर्षे आम्ही या प्रकल्पासाठी प्रयत्न करत होतो. पण आता पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

शहरभर लागणारे दिवे हे केवळ एलईडी नसून ते स्मार्ट असणार आहेत.या प्रकल्पात उपनगरांचाही त्यात समावेश आहे.नवीन लेआऊटला मनपाने पोल दिल्यानंतर त्यावरही हे दिवे प्रकाशमान होतील नगर शहराच्या वैभवात या प्रकल्पा मुळे भर पडेल व प्रलंबित विकासाचे एक-एक प्रकल्प मार्गी लावली जातील असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

अहमदनगर महानगर पालिकेच्या वतीने इस्मार्ट संस्थेला स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कार्यारंभ आदेश संस्थेला देताना मनपा आयुक्त शंकर गोरे,आ.संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले,मा.विरोधी पक्ष नेते संजय शेंडगे व एजन्सी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

आ.संग्राम जगताप पुढे म्हणाले की,पथदिवे बंद असल्याने शहरातील बहुतेक रस्ते अंधारात आहेत. हा नगरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर मार्गी लागला.जास्तीचे वीज खर्च करणारे जुने दिवे काढून त्याऐवजी ३५ हजार नवीन स्मार्ट एलईडी दिवे बसवण्यासाठी मंगळवारी संबंधित संस्थेला मनपाने कार्यारंभ आदेश दिले.या आदेशामुळे पुढील सात वर्षे पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

यावेळी बोलताना मनपा आयुक्त गोरे म्हणले की,नगर शहरात डीबीएफओएमएमटीसाठी (डिझाईन, बिल्ड फायनान्स ऑपरेट मेंटेन मॉनिटाईझ अँड ट्रान्सफर) तत्त्वावर एजन्सो नियुक्त करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. या या निर्णयामुळे शहरातील ठीक-ठिकाणी स्मार्ट एलईडी बसवण्यात येणार आहेत.

हा प्रकल्प तांत्रिक कारणांसह तक्रारींमुळे खोळंबला होता. निविदाकारांना प्रात्यक्षिक सादर करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार ज्या एजन्सीचे दिवे अधिक वीजबचत करून जास्तीचा प्रकाश देतील त्या संस्थेला निकप तपासून कार्यारंभ आदेश देण्यात येणार होते. परंतु, प्रात्यक्षिकाच्या मुद्द्यावरून हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यामुळे पुढील प्रक्रिया थावली होती.

न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वीच निकाल दिल्यानंतर मनपाने पुढील प्रक्रिया सुरू केली.त्यानुसार मनपाने ई स्मार्ट एनर्जी संस्थेची निवड केली.सोल्युशन परंतु पुन्हा नगरसेवकांनी तक्रारी केल्यानंतर या संस्थेने काम केलेल्या जामनगर व मोहाली महानगरपालिकांकडून मनपाने मत मागवले होते.सर्व बाबी पूर्ण केल्यानंतर ई-स्मार्ट संस्थेला कार्यारंभ आदेश देण्यात आले.

ई स्मार्ट एजन्सी शहरातील जुने दिवे काढून पुढील चार महिन्यांत नवीन दिवे बसवणार आहे.प्रत्येक पोलला नंबर असल्याने नागरिकांनी तक्रार केल्यानंतर २४ तासांत दिवा सुरू करण्याचे बंधन संबंधित एजन्सीवर असेल. अन्यथा मनपाकडून एजन्सीवर दंड आकारणी होऊ शकते.

रोहिणी शेंडगे, महापौर – शहर एलईडीमय होणार नगर शहरात अनेक वर्षांपासून पथदिव्यांचा प्रश्न होता,हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी डीबीएफओएमएमओ तत्वावर स्मार्ट एलईडी पथदिवे बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.संबंधित एजन्सीला या कामाचे कार्यारंभ आदेश दिले आहेत.त्यामुळे लवकरच नगर शहर एलईडोमय होईल,याचा मनस्वी आनंद आहे.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles