आनंद कॉलनी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
अहमदनगर प्रतिनिधी – शहरातील प्रत्येक नागरिकांला शहरा बद्दल आपुलकी असावी या माध्यमातून आपले शहराशी नाते निर्माण होते.शहर विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे.नगर शहर ही आपली एक कर्मभूमी आहे.
काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी नगर शहराला नावे ठेऊन शहराची बदनामी करत असतात.परंतु आम्ही शहर विकासाचे एक-एक प्रश्न हाती घेऊन कायमस्वरूपी मार्गी लावत आहोत. येत्या काही दिवसांमध्ये शहरातील विकासाचे एक-एक प्रश्न कमी होऊन प्रश्न मुक्तीकडे वाटचाल करत आहे.
विकसित शहर म्हणून नगर शहराची ओळख निर्माण करायची आहे.पूर्वी नगरसेवक लाईट,कचरा,पाणी या प्रश्नांमध्ये अडकून पडत होते आता हे सर्व प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागल्या मुळे त्याना इतर विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळ भेटणार आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

प्रभाग क्र.१४ मध्ये आनंद कॉलनी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी उपमहापौर गणेश भोसले,नगरसेवक प्रकाश भागानगरे,मा.नगरसेवक संजय चोपडा,ईश्वर मुनोत,मदनलाल धाडीवाल,नंदूभाऊ मुथा,शिरीष चंगेडिया,राजेंद्र गुजर,सुरेश कटारिया,सुनील छाजेड,सचिन भांडरी,सिद्धांत मंडलेच,भावना छाजेड,आशाताई मुनोत,लताताई गुजर,सुनीता भांडरी तसेच प्रभागातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की,आमदार संग्राम जगताप यांनी विकासाच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करून मुळापासून कायमस्वरूपीचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करत आहे.अनेक जण म्हणतात शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
परंतु शहरातील जमिनीअंतर्गत कामांना प्रथम प्राधान्य देऊन ते कामे प्रगतीपथावर चालू आहेत. ती कामे पूर्ण झाल्यास शहरभर रस्त्यांच्या कामांना मोठ्या प्रमाणात सुरूवात होईल,साई उद्यान येथे लवकरच ६० लाख रुपये खर्च करून कारंजा उभा केला जाणार आहे.
प्रभाग क्रमांक १४ मध्ये पुढील दोन वर्षांमधील विकासाचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही आनंद कॉलनी येथील सर्व विकासाचे प्रश्न मार्गी लावले असल्याचे त्यांनी सांगितले.