नरसाळे,गोस्वामी या सभासदांच्या पाठपुराव्याला अखेर यश

0
84

पारनेर सैनिक बँकेची सभा रद्द करण्याची संचालक मंडळावर नामुष्की

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने दि. 30 सप्टेंबर रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द केली असून, ही सर्वसाधारण सभा बँकेचे सभासद बाळासाहेब नरसाळे व विनायक गोस्वामी यांच्या पाठपुराव्यामुळेच रद्द करण्याची नामुष्की संचालक मंडळावर ओढवली आहे.

सहकार नियम धाब्यावर बसवून नियमांचे पालन न करता ही सर्वसाधारण सभा घाईगर्दीत घेऊन मागच्या आर्थिक वर्षातील नियमबाह्य झालेल्या कामकाजास तसेच आर्थिक व्यवहारास मान्यता घेण्याचा व पोट नियम दुरूस्ती करत सभासदांच्या अधिकारावर गदा आणन्याचा कुटील डाव संचालक मंडळाने आखला होता.

मात्र बँकेचे जागरुक सभासद बाळासाहेब नरसाळे, व विनायक गोस्वामी यांच्या प्रयत्नामुळे तो कुटील डाव जो की, बँकेच्या हिताच्या दृष्टीने व ठेविदारांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकला असता तो डाव हाणून पाडला गेला आहे.

बँकेच्या संचालक मंडळाने बेकायदेशीर बोलावलेली सर्वसाधारण सभा रद्द केल्याची जाहीर सुचना व प्रगटन प्रसिद्ध करण्याची नामुष्की बँकेच्या मुख्य कार्यकारी आधिकार्‍यांना द्यावी लागली आहे. याबाबत नरसाळे व गोस्वामी यांनी सांगितले की, सैनिक सहकारी बँक ही माजी सैनिकांनी स्थापन केलेली असून, या बँकेत सर्वसामान्य जनतेच्या भरपूर ठेवी आहेत.

बँकेचे विद्यमान संचालक मागील अनेक वर्षांपासून अत्यंत बेजबाबदारपणे सहकार खात्याचे व आरबीआयच्या मापदंडाचे पालन न करता केवळ स्वतःच्या स्वार्थाकरिता नियमबाह्य कामे करीत असल्याचे स्पष्ट केले. तर मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे हे मनमर्जी पणाने बेकायदा बँक चालवत असून त्यांच्या चुकामुळेच बँकेला जाहिरातींचा आर्थिक भार सोसावा लागत आहे.

सभा रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर का ओढवली याचे आत्मचिंतन संचालक मंडळाने व मुख्यकार्यकारी आधिकार्‍यानीं करावे व यापुढे लेखापरीक्षण झाल्यावर सर्व सभासदांना अहवाल द्यावा व वार्षिक सभेला उपस्थित नसलेल्या सर्व सभासदांची गैरहजरी क्षमापीत करावी, असा विषय घ्यावा अन्यथा आम्हाला सभासदांच्या हितासाठी पुन्हा सहकार खात्याकडे न्याय मागावा लागणार असल्याचे म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here