नवीन उपचार पध्दतीने रूग्णांना दिलासा देण्याचे काम कौतुकास्पद : आ.संग्राम जगताप

नवीन उपचार पध्दतीने रूग्णांना दिलासा देण्याचे काम कौतुकास्पद : आ.संग्राम जगताप

आनंदधाम भक्तनिवास येथील दंत चिकित्सा शिबिराला मोठा प्रतिसाद

नगर:  दाताचे दुखणं हे खूप वेदनादायी असते. खराब झालेले, किडलेले दात वेळीच काढले नाही तर वेदना आणखी वाढतात. आचार्य श्रींच्या पुण्यस्मृतीनिमित्त आयोजित दंत चिकित्सा शिबीरात दात वेदनाविरहित पद्धतीने काढण्यात येत असल्याने रुग्णांना लाभ होत आहे. वेदना मुक्त करणारी सेवा हीच साधूसंतांना अभिप्रेत अशी सेवा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि नवनवीन उपचार पद्धतीचा अवलंब करून रूग्णांना दिलासा देण्याचे काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

          आचार्य सम्राट पूज्य आनंदऋषीजी म.सा. यांचा 32 वा स्मृतिदिन,  आनंदधाम फौंडेशनची 4 थी वर्षपूर्ती आणि नगरच्या सामूहिक विवाहाचे प्रणेते स्व. मुकनदासजी दुगड यांच्या 36 व्या स्मृतीदिनानिमित्त आनंदधाम भक्त निवास येथे आयोजित दंत चिकित्सा शिबीराचे उद्घाटन प्रेमलता दुगड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी म.सा., प्रबुद्ध विचारक पूज्य आदर्शऋषीजी महाराज, पूज्य आलोकऋषीजी महाराज, महासतीजी पूज्य अर्चनाजी म.सा., पूज्य विश्वदर्शनाजी म.सा., पूज्य प्रणवदर्शनाजी म.सा. यांनी मांगलिक दिली.
याप्रसंगी आ.संग्राम जगताप, बडीसाजन श्री संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा, राजेंद्र बोथरा, गोपाल मणियार, माजी उपमहापौर गणेश भोसले, अरूण दुगड, अनिल दुगड, माजी नगरसेवक संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, सी.ए., आयपी अजय मुथा, राजेंद्र ताथेड, विजय बिनायके, सीमा दुगड, मनिष दुगड, किशोर ताथेड, संजीवनी ताथेड, विशाखा दुगड, अंकिता कटारिया, कियांश दुगड, पनालाल बोरा, बाळू कांकरिया, तज्ज्ञ डॉ. सरोज जोशी (राजकोट), डॉ. श्रेणिक नहाटा आदींसह आनंदधाम फौंडेशनचे सदस्य  उपस्थित होते.
डोक्यावर हात आणि हातात दात अशा उपचारांसाठी  प्रसिद्ध असलेल्या डॉ. जोशी यांच्या उपचार पद्धतीने रूग्णांचे दात काढण्यात आले. हलणारे, किडलेले, खराब झालेले कोणतेही दात भूल न देता काढण्यात आले. दात काढताना कोणतीही वेदना अथवा रक्तस्राव होत नाही. त्यामुळे रूग्णांना कमी कमी वेळेत खराब, दुखऱ्या दातापासून सुटका मिळते. डायबेटिक, हृदयरोग असलेल्या रूग्णांचे दातही योग्य काळजी घेऊन काढण्यात आले. अनिल दुगड यांनी स्वागत केले. प्रविण मुनोत यांनी आभार मानले. तब्बल 444 रूग्णांनी दोन दिवसीय शिबिराचा लाभ घेतला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!