नांदेड येथील चोरीची स्विफ्ट सह तिघांना पकडण्यास पाटोदा पोलिसांना यश

0
118

पीआय मनिष पाटील,एपीआय कोळेकर यांची धडाकेबाज कारवाई

अंमळनेर (सुनिल आढाव ) – नांदेड येथुन चोरी गेलेली स्विफ्ट कार क्रमांक एम एच 12 आर.एन .4419 हि चुंभळी फाटा या ठिकाणी पकडण्यास पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील यांच्या सह एपीआय धरणीधर कोळेकर ,पोलीस कर्मचारी बाळु सानप ,सुनिल सोनवणे ,डोके ,वाहतूक शाखेचे क्षीरसागर यांना यश आले आहे .

नांदेड शहारातुन चोरी झालेली स्विफ्ट गाडी हि पाटोदा शहराकडे येत असल्याची माहिती शनिवारी पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील यांना मिळताच त्यांनी चुंभळी फाटा या ठिकाणी नाकाबंदी करुन सदरील गाडी व गाडीतील तिघांना ताब्यात घेतलेले आहे.

पाटोदा पोलिसांनी चुंभळी फाट्यावर नांदेड येथुन चोरी गेलेली स्विफ्ट पकडण्यासाठी चुंभळी फाट्यासह चुंभळी रोडवर देखील साध्या वेषात पोलीस तैनात केले होते नांदेड येथुन चोरी गेलेल्या वर्णनाची स्विफ्ट गाडी चुंभळी फाट्यावर येताच प्रसंगावधान राखत पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील ,सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर ,पोलीस कर्मचारी बाळु सानप ,डोके ,सोनवणे ,क्षीरसागर सह आदींनी ती चोरीची स्विफ्ट गाडी व गाडीतील तिघांना ताब्यात घेतले .

———–

नांदेड येथुन चोरी गेलेली स्विफ्ट गाडी सह गाडीतील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे या बाबत नांदेड पोलिसांना माहिती कळवण्यात आली असल्याची माहिती पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील व एपीआय धरणीधर कोळेकर यांनी दिली.

———

चोरी गेलेली स्विफ्ट गाडी हि चुंभळी फाट्यावर येताच पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील ,सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर,पोलीस कर्मचारी बाळु सानप,डोके, क्षीरसागर,सोनवणे यांनी जिवावर उध्दार होऊन स्विफ्ट चोरांना गजाआड केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here