कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
श्रमदान हा ग्रामविकासाचा पाया असून येथील सर्व सामाजिक संघटना व नगरपंचायतने केलेले कार्य दिशादर्शक आहे.येथील हे काम राजकारणा पलीकडचे व आ.रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील पाहण्यासाठी देशभरातून लोक येतील असे प्रतिपादन आदर्शगाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
सावता परिषद महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा,राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा नगरसेविका मनिषा सोनमाळी यांच्या वतीने येथील नगरपंचायतीने माझी वसुंधरा स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक पटकविल्या बद्दल सलग वर्षभर श्रमदान करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांचे शिलेदार आणि शहराला बहुमान मिळत नाही तो पर्यंत जाहीर सत्कार स्विकारनार नाही असा संकल्प करणाऱ्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदा पवार यांचा विशेष सन्मान पोपटराव पवार यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले,सचिन सोनमाळी,मेट्रोचे अध्यक्ष राहुल सोनमाळी,तालुका उपाध्यक्ष सतिश पाटील,राष्ट्रवादीचे नेते प्रसाद ढोकरीकर,नानासाहेब सोनमाळी उपस्थित होते.
या वेळी सोडती द्वारे बावीस महिलांना पैठणी सप्रेम भेट म्हणून देण्यात आल्या.
यावेळी पोपटराव पवार म्हणाले की सलग वर्षभर श्रमदान करणे ही सोपी गोष्ट नाहीं.मात्र कामात सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळते.योग्य दिशा मिळाली की गाव बदलायला वेळ लागत नाही.त्याची प्रचिती येथे आल्यावर येते.प्लास्टिक निर्मूलन ही जागतिक समस्या आहे.माती आणि शेतीशी नात जोडलं गेलं की क्रांती घडते.संस्काराचा धागा आणि दूरदृष्टीने युवा आमदार रोहित पवार यांचे काम मोठ्या जोमाने सुरू आहे.येथे कधीही कुठेच काही कमी पडणार नाही,फक्त तुमची झोळी फाटू देऊ नका.संकटकाळी धावून जाणे ही आपली संस्कृती आहे.
त्यामुळे हातात हात घालून काम केल्यास कर्जत राज्यात नव्हे तर देशात एक दिवस अव्वल होईल यात शंका नाही.नगरसेविका मनिषा सोनमाळी यांनी राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.
यावेळी बोलताना मनिषा सोनमाळी म्हणाल्या की कर्जत इथे सामाजिक संघटनेचे शिलेदार गेल्या एक वर्षांपासून सलग श्रमदान करीत आहेत याच प्रमाणे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी नगरपंचायत माझी वसुंधरा स्पर्धेत यश मिळाल्याशिवाय सत्कार स्विकारणार नाही असे जाहीर केले होते.त्यामुळे या सर्वांचा बहुमान राज्यातील आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते करताना मला आत्मिक समाधान मिळाले आहे.
यावेळी सुनंदा पवार व आशिष बोरा यांचे भाषण झाले आभार नगरसेविका उषा राऊत यांनी मानले.