प्रभाग क्रमांक ७ मध्ये नगरसेवक अशोक बडे यांच्या प्रयत्नातून कापडी पिशवी वाटपाचा शुभारंभ संपन्न.
नगर : पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दिवसेंदिवस वातावरणामध्ये बदल होताना दिसत आहे. त्यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आता कुठल्याही ऋतुमानात ऊन, वारा, पाऊस, थंडी जाणवताना दिसत आहे. पर्यावरणातील बदलाला मानवच जबाबदार आहे, त्यातच मानवाकडून होणारा प्लास्टिक वस्तूंचा वापर हा पर्यावरणाला घातक ठरत असून यात प्लास्टिक पिशवीमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होताना दिसत आहे. नागरिकांमध्ये प्लास्टिक मुक्तीची लोक चळवळ हाती घेऊन कापडी पिशवी वापरण्यासाठी जनजागृती करणे काळाची गरज बनली आहे. महिलांनी कापडी पिशवी वापरण्याचा संकल्प करून समाजामध्ये जनजागृती करावी. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने उपाय योजना करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्याला पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. प्रभाग क्रमांक ७ मध्ये घरोघरी कापडी पिशवीचे वाटप करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन नगरसेवक अशोक बडे यांनी केले.
शिवसेना पक्ष प्रमुख मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मधील बोल्हेगाव येथील पितळे कॉलनीत नगरसेवक अशोक बडे यांच्या प्रयत्नातून कापडी पिशवी वाटपाचा शुभारंभ संपन्न झाला आहे. यावेळी नगरसेविका कमल सप्रे, माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे, प्रा.अंबादास शिंदे, कुंडलिक कातोरे, भाऊसाहेब खेडकर, सुरेश साळवे, सुरेश आढाव, दिलीप पेटकर, वामन आडकर, बाबासाहेब त्रिंबके, सुदर्शन वाघमारे, बाळासाहेब सोनवणे, अशोक भापकर,विलास शिरसाठ, विलास वाघमारे, सुरेश यादव, सोन्याबापू अकोलकर, सखाहरी केदारी, वसंत पवार, अमोल चाबुकस्वार, रोहन काळे, सुनंदा जाधव, अरुणा गोरे, जाटलीन पिंटो, धनश्री गोरडे, हर्षला एडके, पायल लुनावत, नम्रता चव्हाण, कुंदा वाघमारे, मंगल अकोलकर, संगिता शिंदे, सुनिता सुंबे, मनिषा जाधव, कोमल पवार, शोभा त्रिंबके, तसेच परिसरातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
नगरसेविका कमल सप्रे म्हणाल्या की, महिलांनी कापडी पिशव्या वापरण्यासाठी पुढाकार घ्यावा, कापडी पिशवी वापरण्यासाठी समाजात जनजागृती होण्यासाठी प्रभाग ७ मध्ये नगरसेवक अशोक बडे यांच्या प्रयत्नातून कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले. प्रभागाच्या विकासाबरोबर सामाजिक प्रश्नही मार्गी लागणे गरजेचे आहे, कापडी पिशवीचा वापर वाढवून प्लास्टिक पिशवीचा वापर टाळावा असे आवाहन त्यांनी केले