अहमदनगर प्रतिनिधी – नाथ संप्रदाय हा पुरातन संप्रदाय असून, भारतात अनेक प्रातांत नाथपंथी साधूंचे वास्तव आहे. नाथपंथाचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य हे साधू संपूर्ण देशभर करत आहे.यानिमित्त भ्रमण करुन धार्मिकता वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.नाथपंथाचे कार्य नगरमध्येही चांगल्या पद्धतीने सुरु असून,याचे समाधान वाटते.
नगरमधील श्री विशाल गणेश मंदिराचा नुकताच झालेला जिर्णोद्धार हा सुबक व आकर्षक असून,त्यामुळे मंदिराच्या वैभवात भर पडत आहे.श्री विशाल गणेशाचे आशिर्वादाने आज प्रसन्न वाटत आहे,असे प्रतिपादन कर्नाटक येथील कालभैरव मठातील नाथ संप्रदायाचे राजा योगी निर्मलनाथजी यांनी केले.
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरास कर्नाटक येथील कालभैरव मठातील नाथ संप्रदायाचे राजा योगी निर्मलनाथजी यांनी भेट दिली असता आरती करण्यात आली.
याप्रसंगी योगी सिंगनाथजी योगी गणेश नाथजी,महंत पुजारी संगमनाथ महाराज,विजय क्षीरसागर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज यांनी श्री विशाल गणेश मंदिराच्यावतीने सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली.तसेच देवस्थानच्यावतीने या साधूंचा यथोचित सन्मान करण्यात आला.