नायब तहसिलदार ढाकणे यांची बदली करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक

0
94

नायब तहसिलदार ढाकणे यांना खुर्चीचा मोह सुटेना…

अंमळनेर प्रतिनिधी – सुनील आढाव

राज्यातील कर्मचाऱ्यांना वेगळा निर्णय व बीड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना शासन निर्णय वेगळा का? नायब तहसिलदार सुनिल ढाकणे यांच्यावर अनेक वेळा आरोप झाले असल्यामुळे त्यांची विभागीय चौकशी करून बदली करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे कट्टर कार्यकर्ते गोरख झेंड, बाळासाहेब गायकवाड,राहुल शिरोळे ,जावळे यांनी उपविभागीय अधिकारी पाटोदा यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

पाटोदा तहसील मधील नायब तहसिलदार सुनील ढाकणे हे गेल्या दहा वर्षा पासून पाटोदा तहसिल मध्ये कार्यरत आहेत त्याच्या डोक्यावर मोठा राजकीय आशीर्वाद असल्यामुळे त्यांची बदली अद्यापही झालेली नाही.

नायब तहसिलदार ढाकणे यांच्यावर डोक्यावर मोठा वरदहस्त असल्यामुळे तहसिल मध्ये ते सर्व सामान्य नागरिकांना आरेरावीची भाषा वापरतात तर अनेक वेळा त्यांचावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर अनेक वेळा त्यांची बदली करावी म्हणून अनेक जणांनी मागणी केली असताना ही नायब तहसिलदार ढाकणे यांनाच पाटोदा तहसिलदारच्या रिक्तजागेवर नेहमी तहसिलदार पद असो या नगरपंचायत मुख्यअधिकारी असो तहसिल मधील विविध विभागाचा चार्ज कसा मिळतो ही गंभीर बाब असल्यामुळे गेली दहा वर्षा पासून शासन निर्णयाला केराची टोपली दाखवत पाटोदा तहसिल मध्ये दबधरून बसलेल्या नायब तहसिदार ढाकणे यांची विभागीय चौकशी करून त्यांची तात्काळ बदली करावी.

अशी मागणी उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा यांना निवेदना द्वारे वंचित बहुजन आघाडीचे कट्टर कार्यकर्ते गोरख झेंड बाळासाहेब गायकवाड, सुनील जावळे,राहुल शिरोळे ,सुनिल जावळे ,विठ्ठल आबा पवळ ,सुभाष सोनवणे ,रमेश वारंगुळ ,शामसुंदर वाघमारे ,यांच्या सह इत्यादीनी केली असून नायब तहसिलदार ढाकणे यांची तात्काळ बदली झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देखील पाटोदा वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने गोरख झेंड ,बाळासाहेब गायकवाड सह आदींनी दिला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here