नालेगाव गाडगीळ पटांगण येथे श्रीराम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालीसा संपन्न व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन.
नगर : नालेगाव गाडगीळ पटांगण येथे सालाबाद प्रमाणे श्री छत्रपती शिवराय तरुण मंडळ व पावन हनुमान व्यायाम शाळा यांच्या वतीने श्रीराम नवमी व हनुमान जयंती निमित्त दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळाच्या वतीने हनुमान चालीसा कार्यक्रम संपन्न झाला असून सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अध्यक्ष दत्तात्रय मुदगल यांनी दिली.
अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये दि. 16 एप्रिल रोजी ह भ प दिनकर महाराज चिमणे पैठण, 17 एप्रिल रोजी ह भ प अंकिताताई घुले केज, 18 एप्रिल रोजी ह भ प योगेश महाराज जाधव आळंदी, 19 एप्रिल रोजी ह भ प बापूमहाराज लोंढे आडगाव, 20 एप्रिल रोजी ह भ प श्रीराम महाराज मचे तिसगाव, 21 एप्रिल रोजी ह भ प प्रांजलताई जाधव मिरजगाव, 22 एप्रिल रोजी ह भ प मयुरी ताई ब्राह्मणे आळंदी यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे तरी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन श्री छत्रपती शिवराय तरुण मंडळ व नालेगाव पावन हनुमान व्यायाम शाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच रेणुका भक्ती भजनी मंडळ रेणुका वाडी यांच्या सहकार्याने दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन सकाळी ९ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, दुपारी ३ ते ५ महिला भजन, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ भजनाचा कार्यक्रम व रोज रात्री साडेआठ ते साडेदहा हरिकीर्तन सोहळा संपन्न होणार आहे, दि. 23 एप्रिल रोजी नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने गावातून दिंडी प्रदक्षिणा सोहळा संपन्न होणार आहे सकाळी 11 ते 1 ह भ प मारुती महाराज झिरपे चापडगाव यांचे जाहीर काल्याचे किर्तन संपन्न होणार आहे, माजी आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती व महाप्रसादाचे वाटप होणार आहे तसेच पावन हनुमान भजनी मंडळ व गुरुदत्त भजनी मंडळाचा जागर कार्यक्रम संपन्न होणार आहे.
- Advertisement -