नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून आप्पासाहेब शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
जिल्ह्यातील कार्यरत शिक्षक निवडून येण्यासाठी शिक्षकांनी एकजुटीची बांधली मोट
अहमदनगर (प्रतिनिधी)- नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब रामराव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक येथील आयुक्त कार्यालयात गुरुवारी (दि.6 जून) शिंदे यांनी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे अर्ज सुपुर्द केला. यावेळी नगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यामधून मोठ्या संख्येने शिक्षक कार्यकर्ते उपस्थित होते.
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत पाचही जिल्ह्यांमधील संस्थाचालक तसेच राजकीय पुढारी यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. हा मतदारसंघ घटनेप्रमाणे फक्त शिक्षकांसाठी दिला गेलेला आहे आणि या मतदारसंघांमध्ये पाचही जिल्ह्यात कार्यरत शिक्षक म्हणून काम करणारे अप्पासाहेब शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. सर्व कार्यरत शिक्षकांनी शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. याच मतदारसंघांमध्ये नगर जिल्ह्यातून फक्त कै. रा.ह. शिंदे हे 1982 ते 87 या कालखंडात शिक्षक आमदार म्हणून होते. त्यानंतर नगर जिल्ह्याला एकदाही संधी मिळालेली नाही. या मतदार संघात जिल्ह्यातील कार्यरत शिक्षक निवडून येण्यासाठी शिक्षकांनी एकजुटीची मोट बांधली आहे.
याप्रसंगी टीडीएफचे जिल्हाध्यक्ष एम.एस. लगड, सचिव मुस्ताक सय्यद, चांगदेव कडू, राज गवांदे, विठ्ठलराव पानसरे, संभाजी गाडे, प्राचार्य वाव्हळ सर, बाळासाहेब निवडुंगे, आत्माराम दहिफळे, समाधान आरक, अमोल ठाणगे, नंदकुमार शितोळे, बाळासाहेब मुळे, जयसिंग नरवडे, भाऊसाहेब जेवढे, सत्यनाथ शेळके, सरोदे सर, संजय शिंदे, उमेश गुंजाळ, रमाकांत दरेकर, बद्रीनाथ शिंदे, रावसाहेब शेळके, रोशन सरोदे, भागवत सर, बाळासाहेब राजळे, मुख्याध्यापक जाधव, येणारे सर, प्रशांत होन, संजय देशमाने, जनार्दन सुपेकर, दीपक जाधव, बाळासाहेब भोर, जठार सर, बाबासाहेब पवार, विजय थोरात, सुधाकर गांगर्डे, संदीप बांगर, अविनाश रामफळे, गणेश कुऱ्हे, बापूसाहेब दुशिंग, अर्जुन लंगोटे, मिनीनाथ कुसमुडे, संजय रोकडे, जगताप सर, सुनील गागरे, श्रीकांत म्हसे, प्रसाद साठे, संतोष ठाणगे, गव्हाणे सर आदी उपस्थित होते.