नाशिक शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदिप गुळवे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचा नगरमध्ये मेळावा
नगरमधील मतदार संदिप गुळवे यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून विजयात मोठा वाटा उचलतील – प्रा.अंबादास शिंदे
नगर – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठे यश मिळविले आहे. त्यामुळे येणार्या नाशिक शिक्षक मतदार संघातही महाविकास आघाडीचे उमेदवार संदिप गोपाळराव गुळवे पाटील हे मोठया मतधिक्क्याने विजयी होतील. नगरमधील शिक्षक मतदार हे महाविकास आघाडीच्या पाठिमागे खंबीरपणे उभे राहून विजयात मोठा वाटा उचलतील. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तन-मन-धनाने प्रचार करतील, असा विश्वास प्रा.अंबादास शिंदे यांनी व्यक्त केला.
नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार संदीप गोपाळराव गुळवे पाटील यांच्या उपस्थितीत यश ग्रँड हाँटेल अहमदनगर येथे शिक्षक मतदार बंधू- भगिनींच्या उपस्थित शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने मेळावा घेण्यात आला याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक योगीराज गाडे, संग्राम कोतकर, अशोक दहिफळे, रयत शिक्षण संस्थेच्या रयत बॅकेचे प्रा.अशोकराव झरेकर, अरुण झेंडे, गौरव ढोणे, शिक्षक सेना जिल्हा प्रमुख प्रा.अंबादास शिंदे, कार्याध्यक्ष रावसाहेब म्हस्के, शहराध्यक्ष पारुनाथ ढोकळे, सुरेश क्षीरसागर, बाळासाहेब ढोबळे, एन डी एस टी संचालकी अरुण पवार, टीडीएफचे व एनडीएसटी संचालक छोटूभाऊ शिरसाट, एनडीएसटी संचालक जयंत मदाने आदिंसह बहुसंख्य शिक्षक मतदार पस्थित संपन्न झाला.
याप्रसंगी गिरिष जाधव म्हणाले, नाशिक मतदार संघातील शिक्षक मतदार संघात नगर जिल्ह्यातील शिक्षक मतदारांची संख्या मोठी आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार संदिप गुळवे यांना नगरमधून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
याप्रसंगी उमेदवार संदिप गुळवे म्हणाले, नगरने नेहमीच महाविकास आघाडीला साथ दिली आहे. नगरमध्ये सध्या बदलांचे वारे आहेत, त्यामुळे यंदाच्या शिक्षक मतदार संघातही बदल होणार हे निश्चित. नगरमधील शिवसेनेने माझ्या पाठिशी उभे राहून चांगल्या मताधिक्क्यांनी निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला.
प्रास्तविक रावसाहेब म्हस्के यांनी केले तर सुत्रसंचालन पारूनाथ ढोकळे यांनी केले.