निकृष्ट कामे,इतर शासकीय कामातील अनियमितता,अनागोंदी व भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ……

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे उपोषण

 

अहमदनगर(प्रतिनिधी)- पारनेर व नगर तालुक्यात झालेले रस्त्यांचे निकृष्ट कामे, इतर शासकीय कामातील अनियमितता, अनागोंदी व भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण करण्यात आले.

या उपोषणात समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे,पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे,संगमनेर तालुकाध्यक्ष संतोष भांड,सचिव नंदकिशोर कदम,बाळा धरम,बंटी मिडगे, शेखर भांड,सातपुते,कुंडलीक भांड,अशोक भांड,नंदू भांड,राजू शिंदे,उमाशंकर यादव सहभागी झाले होते.

पारनेर तहसील कार्यालय अंतर्गत दीड वर्षापासून थेम व पोटखराबा दुरुस्ती करण्याबाबत जाणीवपूर्वक अधिकारी कार्यवाही करीत नसून,शेतकर्यांची अडवणुक करीत आहे.

संबंधित अधिकार्यांवर कारवाई व्हावी. मौजे वडगाव सावताळ (ता. पारनेर) येथील वन विभागाच्या कामाबाबत अनियमितता आहे. काही मजूर कामावर नसताना त्यांच्या खात्यावर पैसे टाकून ते काढून घेण्यात आले आहेत.तेथील मजुराच्या खात्यावर वर्ग केलेल्या रकमेच्या बिलाची चौकशी करावी.

पारनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मनमानीमुळे ग्रामस्थांच जीव जात असून, नुकतेच ४ नोव्हेंबर रोजी सर्पदंश होऊन कर्मचार्यांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णाची हेळसांड झाल्याने एकाचा मृत्यू झाला. याला जबाबदार असणार्या अनुपस्थित कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करावी.

पारनेर तालुक्यातील सैनिक बँकेत शासकीय रकमेचा अपहार प्रकरणी चुकीचा गुन्हा दाखल झाला असून, यामध्ये जबाबदार असणारे तहसील कार्यालयाचे अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई व्हावी,

धोत्रे बुद्रुक (ता. पारनेर) येथील शेतकर्‍यांना महामार्गासाठी संपादित केलेल्या जमीनीचा मोबदला तात्काळ मिळावा, नगर तालुक्यातील मौजे जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून,याची चौकशी होऊन शासकीय अभियंता व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी,

जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत अपंगाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून पदोन्नती घेणार्या शिक्षक कर्मचार्यांवर गुन्हे दाखल करावे तसेच उपवनरक्षक अनिल थिटे याच्यावर दोन वेळा लाच लुचपतची कारवाई होऊन देखील त्याला पदनियुक्त करण्यात आले असून, सदर भ्रष्ट अधिकार्‍यास तात्काळ पदमुक्त करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

सदर मागण्या मान्य न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रोडे यांनी दिला आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!