निकृष्ट कामे,इतर शासकीय कामातील अनियमितता व अनागोंदीच्या निषेधार्थ अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे १२ डिसेंबरला आमरण उपोषण

0
94

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

पारनेर व नगर तालुक्यात झालेले रस्त्यांचे निकृष्ट कामे, इतर शासकीय कामातील अनियमितता व अनागोंदीच्या निषेधार्थ अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर १२ डिसेंबर पासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

विविध मागण्यांसंदर्भात समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.

पारनेर तहसील कार्यालय अंतर्गत दीड वर्षापासून थेम व पोटखराबा दुरुस्ती करण्याबाबत जाणीवपूर्वक अधिकारी कार्यवाही करीत नसून,शेतकर्‍यांची अडवणुक करीत आहे.संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी.

मौजे वडगाव सावताळ (ता. पारनेर) येथील वन विभागाच्या कामाबाबत अनियमितता आहे.काही मजूर कामावर नसताना त्यांच्या खात्यावर पैसे टाकून ते काढून घेण्यात आले आहेत.तेथील मजुराच्या खात्यावर वर्ग केलेल्या रकमेच्या बिलाची चौकशी करावी.

मौजे चिंचोली (ता. पारनेर) येथील ग्रामपंचायत अंतर्गत महादेव मंदिर येथील रस्त्याचे काम एक ते दीड वर्षापुर्वी करण्यात आले.सदर झालेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून,या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी,ठेकेदार व सरपंच यांच्यावर शासकीय कारवाई करून गुन्हे दाखल करावे.

पारनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मनमानीमुळे ग्रामस्थांच जीव जात असून, नुकतेच ४ नोव्हेंबर रोजी सर्पदंश होऊन कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णाची हेळसांड झाल्याने एकाचा मृत्यू झाला.याला जबाबदार असणार्‍या अनुपस्थित कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी.

नगर तालुक्यातील मौजे जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून,याची चौकशी होऊन शासकीय अभियंता व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी.

तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत अपंगाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून पदोन्नती घेणार्‍या शिक्षक कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.या मागण्यांसाठी समितीच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here