निमगाव वाघात रमजान ईद उत्साहात साजरी
गावात धार्मिक एकतेचे दर्शन
ग्रामस्थांच्या वतीने मशिदीतील मौलानाचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील मशिदमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी सामुदायिक नमाज पठण करुन, गावाच्या सुख, समृध्दी व शांततेसाठी प्रार्थना केली. नमाजनंतर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी हिंदू बांधव मशिदमध्ये आर्वजून उपस्थित होते. हिंदू-मुस्लिम ग्रामस्थांनी एकमेकांना अलींगण देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यातून गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले.
गावाच्या मशिदमध्ये मौलाना आतिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आली. यावेळी उद्योजक दिलावर शेख, पै. कादर शेख, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, उस्मान शेख, रज्जाक शेख, दिलावर शेख, राजू शेख, आदम शेख, अहमद सय्यद, बख्तार सय्यद, बन्सी शेख, नवाब शेख, सलिम शेख, शब्बीर शेख, नासिर शेख, मोसीम शेख, आबिद शेख, गुड्डू शेख, अन्सार शेख, नवाझ सय्यद, पोलीस नाईक खंडेराव शिंदे, पै. संदिप डोंगरे आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातील ग्रामस्थांच्या वतीने पै. नाना डोंगरे यांनी मशिदीतील मौलाना आतिफ शेख यांचा सत्कार केला. ग्रामस्थांनी मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शिरखुर्माचा आस्वाद घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.