निमगाव वाघात हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा
विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात; ग्रामस्थांची दर्शनासाठी गर्दी
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) गावात हनुमान जन्मोत्सव सोहळा मंगळवारी (दि.23 एप्रिल) विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात पार पडला. हनुमान मंदिरामध्ये पहाटे विधिवत पूजा व आरती करण्यात आली. तर रात्री भजनाच्या भक्तीरसात भाविक तल्लीन झाले होते.
गावातील भजनी मंडळाने रामभक्त हनुमानजींवर विविध भजन सादर केले. पहाटे मंदिरात अभिषेक करुन आरती करण्यात आली. यावेळी दिवसभर भाविकांनी हनुमानजींच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांना यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
या धार्मिक कार्यक्रमास डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, पिंटू जाधव, भरत बोडखे, तुकाराम फलके, सचिन कापसे, सुरेश जाधव, भाऊसाहेब कापसे, बाबा खळदकर, संदीप डोंगरे, अनिल डोंगरे, पोपट भगत, अजय ठाणगे, गोरख गायकवाड, छगन भगत, दत्तू फलके, विठ्ठल फलके, तुकाराम खळदकर, चंद्रकांत जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांना मंदिरात प्रसादाचे वाटप करण्यात आले.
- Advertisement -