गो शाळेला केलेली मदत ही,गो रक्षणाचेच कार्य – आ.संग्राम जगताप
अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख
गो शाळेला केलेली मदत ही, गो रक्षणाचेच कार्य आहे. समाजाला दिशा देण्याचे कार्य शिक्षक करीत असतात. संतोष निमसे गुरूजी यांनी वर्षभर वृक्षरोपण व संवर्धन तसेच गो शाळेस मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

यावेळी माजीमंत्री शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, शिक्षक परिषदेचे राज्य नेते रावसाहेब रोहोकले, नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक बाळासाहेब पवार, विनित पाऊलबुद्धे, परिषदेचे राज्य उपाध्यक्ष संजय शेळके, शिक्षक बँकेचे चेअरमन अविनाश निंभोरे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, डॉ. वेणुनाथ वेताळ महाराज, सोमनाथ झाडे, अरुण बेद्रे, प्रकाश धुमाळ, गणेश निमसे, संजय शिंदे, प्रवीण ठुबे, विकास डावखरे, नाना बडाख, राम निकम, राजेंद्र मुंगसे, बाबा पवार, मोहनराव राशिनकर, दिलीप दहिफळे, सिमा निकम, संतोष खामकर आदी उपस्थित होते.
शिवाजी कर्डिले म्हणाले की, निमसे गुरुजींनी सामाजिक भावनेने जोपासलेले समाजकार्याचे व्रत प्रेरणादायी आहे. गोशाळेत येऊन गोमातेसाठी ते सातत्याने सेवा देत असल्याचे कौतुक केले.रावसाहेब रोहोकले यांनी निमसे गुरूजी यांचे सामाजिक,शैक्षणिक,संघटनात्मक कार्य दखल घेण्यासारखे आहे.धकाधकीच्या जीवनातही दैनंदिन व्यायामाला तितकेच महत्व देऊन शरीर संपदा जपण्यासाठी नियमित व्यायाम करण्याबाबतचा त्यांचा आदर्श सर्वांनी घेण्याची गरज आहे.तर शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचे योगदान पथदर्शी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय शेळके यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत सुनिल पवळे यांनी केले.कार्यक्रमचे सूत्रसंचालन राजाभाऊ पालवे यांनी केले.आभार सविता दरंदले व संजय दळवी यांनी मानले.