अहमदनगर प्रतिनिधी – दिपक कासवा
स्वतःचा पत्ता व मानसिक भान हरवलेली निराधार महिला (अंदाजित वय ३०) अहमदनगर उपनगरातील केडगाव परिसरात रस्त्यावर फिरत होती.अस्वच्छ, शरीराची दुर्गंधी, कपड्यांचे भान नसलेली.केसांच्या जटा झालेल्या, शरारीवर जखमा अशी तिची अवस्था होती.

स्थानिक नागरिकांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या ‘मानवसेवा’ प्रकल्पाला हाक दिली.संस्थेचे स्वयंसेवक सोमनाथ बर्डे, सुरेखा केदार, राहुल साबळे हे तातडीने निराधार मातेच्या आधारासाठी धावले.
ती माता एका हॉटेल जवळ न्याहाळत होती, कदाचित तिला भुक लागली असावी. तसे संस्थेच्या स्वयंसेवकांनी तिला विचारले परंतु ती काहीही बोलत नव्हती.
‘चला ताई आपल्या घरी’ या आपुलकीच्या शब्दाने तो मायेचा स्पर्श तिला समजला अन् ती लगेचच गाडीत बसली.शनिवार दि.०२ जुलै २०२२ रोजी रात्री १०:१० वा. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या ‘मानवसेवा’ प्रकल्पात दाखल करण्यात आले.
प्रकल्पातील महिला स्वयंसेवकांनी तिला सेवार्थाने स्वच्छ करून भोजन दिले आणि मानसोपचार तज्ञ डॉ.अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले.
मानवसेवा हीच ईश्वर सेवा!
मानवसेवा प्रकल्प
(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काचं घर)
द्वारा – श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ
☎️(०२४१) २४२९९४२
📱९०११७७२२३३