श्रीरामपूर प्रतिनिधी – निलेश लंके प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) या सामाजिक संस्थेवर श्रीरामपूर तालुकाध्यक्ष पदी शाहरुख सय्यद यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे पत्र मा.आ. निलेश लंके यांच्याकडून देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठान प्रदेशाध्यक्ष सुदाम पवार, सचिव कारभारी पोटघन मेजर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष तरटे,खिलारी सर, फय्याज पिंजारी, सचिन पठारे, शाकीर सय्यद, अंजर शहा, लहू खंडागळे, पवन पावसे ई. उपस्थित होते.
ही नियुक्ती त्यांचे सामाजिक काम पाहून सुभान तांबोळी यांच्या शिफारशीने करण्यात आली आहे. निलेश लंके यांनी त्यांच्या कामाचे कौतुक करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
प्रतिष्ठानचे काम फक्त तालुका, जिल्हा पुरते मर्यादित नसून ते पूर्ण महाराष्ट्र राज्यात चालते. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे, रुग्णांना मदत करणे, अपंग बांधवांसाठी ,भगिनींसाठी रोजगार निर्मिती करून देणे, खेळाडूंसाठी प्रोत्साहन पर शिष्यवृत्ती देणे अशा अनेक प्रकारचे काम या प्रतिष्ठान मार्फत चालते. हे प्रतिष्ठान म्हणजे राजकीय व्यासपीठ नसून हे सामाजिक प्रतिष्ठान आहे. अशी माहिती मा.आ.निलेश लंके यांनी यावेळी बोलताना दिली.
या नियुक्ती मुळे शाहरुख सय्यद यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे , आजी . माजी.नगराध्यक्ष,नगर सेवक यांनी शुभेच्छा दिल्या.
(चौकट)
माझ्या सामाजिक कामाची दखल घेऊन सुभान तांबोळी यांच्या शिफारशीने मा.आ. निलेश लंके साहेब यांच्या हस्ते पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे. लंके साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी या पदाचा वापर सामाजिक कामासाठी, गोरगरीब जनतेसाठी करणार आहे प्रमाणे निलेश लंके प्रतिष्ठानचे काम महाराष्ट्रात चालते तसेच काम श्रीरामपूर तालुक्यात करणार आहे.
शाहरुख सय्यद(निलेश लंके प्रतिष्ठान श्रीरामपूर तालुकाध्यक्ष)