निवडणुकीतील उमेदवारांविरुध्द डिच्चू काव्याचा आग्रह धरण्याची भूमिका चुकीची – बाळ लांडे

0
99

डिच्चूकावा निवडणूक आयोग विरुद्ध वापरण्याची गरज
अहमदनगर(प्रतिनिधी)- निवडणुकीच्या रिंगणामधील उमेदवारांना गुन्हेगार समजून, त्यांच्याविरुद्ध डिच्चू काव्याचा आग्रह धरण्याची भूमिका चुकीची असून, डिच्चूकावा निवडणूक आयोग विरुद्ध वापरण्याची गरज असल्याची भावना लोकमान्य यांचे अनुयायी बाळ लांडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या माध्यमातून संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी उमेदवारांच्या विरोधात डिच्चूकावा तंत्र अवलंबण्यास सुरु केलेल्या प्रचार-प्रसाराला बाळ लांडे यांनी आक्षेप घेतला आहे.तर देशात पसंतीप्रमाणे उमेदवाराला मतदान करता यावे, असा अधिकार मतदारांना मिळाला पाहिजे.

या देशात संविधानिक प्रजासत्ताक आणि सध्याची लबाडशाही संपणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
स्वराज्य म्हणजे जनतेचे राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी नरक्या लोकांविरुद्ध डिच्चू कावा वापरला.परंतु सध्याच्या परिस्थितीत निवडणुकीतील उमेदवारा विरोधात डिच्चू कावा वापरण्याऐवजी निवडणूक आयोग विरोधात वापरला पाहिजे.

कारण सध्याच्या निवडणूक पद्धती मध्ये ३० टक्के जनाधार असलेले लोकप्रतिनिधी व पक्ष सत्तेवर येतात. त्याला प्रजासत्ताक म्हणणे हेच लबाडशाहीचे लक्षण आहे.सध्या मतदारांच्या मताला काडीचीही किंमत नाही. त्यामुळे त्यांच्या हातात डिच्चूकावाचा अधिकार देणे चुकीचे ठरणार आहे.

नोटा सारखा अधिकार मतदारांना उपलब्ध असताना, डिच्चू काव्याचा प्रचार करणे म्हणजे मतदारांची दिशाभूल ठरणार असल्याचा आरोप लांडे यांनी केला आहे.

स्वराज्यरुप प्रजासत्ताक निर्मितीसाठी डिच्चूकावा निवडणूक आयोगाने वापरलेल्या प्रचलित सदोष मतदान पद्धतीविरुद्ध वापरावा व पसंतीक्रमाने मतदानाचा अधिकार मतदारांना मिळण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here