निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या चांदबीबी महालाच्या पायथ्याशी भेटणार नेप्ती ची सुप्रसिद्ध मटकी भेळ चा स्वाद
युवकांनी नोकरी मागे न पळता स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे- अरुण जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर पाथर्डी रोड चांदबीबी महालाच्या पायथ्याशी नवीन झालेल्या हॉटेल जय भोले येथे नेप्तीची सुप्रसिद्ध भेळ सेंटरचे शुभारंभ माजी आमदार अरुण काका जगताप व आमदार संग्राम जगताप, अक्षय कर्डिले यांच्या हस्ते फितकापून करण्यात आले यावेळी जय भोले उद्योग समूहाचे संचालक सर्पमित्र कृष्णा पाटील बेरड, पै.ऋषिकेश खामकर आदी उपस्थित होते.
माजी आमदार अरुण काका जगताप म्हणाले की, निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुप्रसिद्ध नेप्ती ची भेळ ही या ठिकाणी उपलब्ध होणार असून नागरिक निश्चित या भेळचा आनंद घेतील व युवकांनी नोकरीच्या मागे न लागता आपल्या स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे असल्याची भावना व्यक्त केली व जय भोले उद्योग समूहाचे संचालक व हॉटेल जय भोले चे मालक सर्पमित्र कृष्णा पाटील बेरड, पै ऋषिकेश खामकर यांना शुभेच्छा देण्यात आले.
उपस्थित सर्व पाहुण्यांचे बेरड पाटील व खामकर पाटील परिवाराकडून सत्कार करून आभार मानण्यात आले..