स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे यांचा गौरव
अहमदनगर प्रतिनिधी – जगात स्वार्थी लोकांची कमतरता नाही. मात्र, तेवढेच निस्वार्थीही धडपडत असतात. या नि:स्वार्थी वृत्तीमुळेच सदभावनेची ओल अजून टिकून आहे. कुणाचेही भले व्हावे, अशी अपेक्षा असलेल्यांचा ध्यास केवळ ‘मदत’ हाच असतो. त्यामुळेच जगात स्वार्थींची संख्या वाढली तरीही, भल्याचाच विचार करणारे समाजाला प्रेरणा देत राहतात, पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
स्नेहबंध सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांचा सामाजिक कार्याबद्दल पद्मश्री पोपटराव पवार यांनी गुणगौरव 2021 पुरस्कार देऊन सन्मान केला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सचिन पेंडूरकर, हेमंत ढाकेफळकर आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, आज अशा निस्वार्थी काम करणाऱ्यांचे कौतुक केले तर समाजाला यापासून नवी प्रेरणा मिळू शकेल. अपेक्षा नको, मदत निस्वार्थ असावी, असाच संदेश हे सामाजिक कार्यकर्ते देऊ इच्छितात. संस्था कुठलीही असो, ती चालणारे माणसे कसे आहेत. यावर त्या संस्थेची प्रगती अवलंबून असते. प्रत्येकाने सामाजिक कार्यात योगदान द्यायला हवे, असेही पवार म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना उद्धव शिंदे म्हणाले, आपल्या कामाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला जलसंधारणाचे महत्त्व पटवून देणारे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्कारामुळे बळ मिळाले आहे. यामुळे काम करण्यास हुरूप वाढेल.