यशस्वी विद्यार्थ्यांची कर्जत शहरांमधून काढली भव्य मिरवणूक
कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत येथील कोटा मेंटाॅर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कर्जत येथील जुनियर कॉलेजची विद्यार्थिनी अर्चना हरिदास नाकाडे हि ३६० पैकी ३६० मार्क मिळवून ती देशात प्रथम आली आहे, तसेच अभय मुकुंद लगड व महेश अशोक पठाडे यांची आय आय टी इंजिनिअरिंग साठी निवड झाली आहे तर सिटीमध्ये कर्जत तालुक्यामध्ये स्वप्नील निकत हा प्रथम आला आहे.या यशाबद्दल सर्वांची कर्जत शहरांमधून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.यानंतर त्यांचा सन्मान करण्यात आला.
कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष केशव अजबे सर यांनी व सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे.
नीट ही देशातील बारावी शास्त्र शाखेतील परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतर दिली जाणारी सर्वोच्च परीक्षा मानली जाते.देशभरातून लाखो विद्यार्थी ही परीक्षा देत असतात.
कर्जत हे शिक्षणाचे माहेरघर ओळखले जाते.दर्जेदार शिक्षण हे बिरुद मिरवणाऱ्या कर्जतकरांना केशव आजबे सर यांनी कर्जत येथे सुरू केलेल्या कोटा मेंटोर्स या महाविद्यालयामुळे प्रथमच देश पातळीवर यश मिळाले आहे. आणि या यशामुळे कर्जत मध्ये आज जल्लोष करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांची कर्जत शहरांमधून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.या यशस्वी विद्यार्थ्यांचा ठिकठिकाणी नागरिकांनी सत्कार देखील केला.
अर्चना नाकाडे ही विद्यार्थिनी या वेळी बोलताना म्हणाली की,केशव आसबे सर व कोटा मेंतोर्स येथील सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनामुळे मला हे यश मिळाले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणी असतात परंतु या ठिकाणी योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे व अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळे मला हे यश मिळाले.
अभय लगड हा विद्यार्थी यावेळी बोलताना म्हणाला की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये योग्य मार्गदर्शन मिळत नाही,परंतु कर्जत येथील कोटा मोटर येथील सर्व शिक्षक व आजबे सर यांच्यामुळे आम्हाला यश मिळाले व माझी आयटीसाठी निवड झाली.
केशव आजबे सर यावेळी म्हणाले की,गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करून हे यश संपादन केले आहे. अर्चना नाकाडे की ग्रामीण भागातील विद्यार्थिनी दोन वर्षांपासून या क्लासमध्ये शिक्षण घेत आहे.
शहरांमध्ये लाख रूपये खर्च करण्यापेक्षा याच ठिकाणी कोटा येथील शिक्षक व सीबीएससी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे.आता पर्यंत २७६ विद्यार्थी सीईटी परीक्षेच्या माध्यमातून गव्हर्मेंट कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहे.तर २७ विद्यार्थी एम बी बी एस साठी निवडले गेले आहेत.
ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांसाठी परिश्रम घेतले आणि यामध्ये यश मिळाले याचे खूप समाधान लाभले आहे.