नीलेश लंके यांचा सुजय विखेंंवर निशाणा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

जाधवांवरील हल्ला शहरातील दहशतीचे मुर्तीमंत उदाहरण

नीलेश लंके यांचा सुजय विखेंंवर निशाणा

नगर : प्रतिनिधी

नगर शहरात आपण अनेक दिवसांपासून जे चित्र पाहतो आहोत त्या दहशतीचे नगरसेवक सचिन जाधव यांच्यावर झालेला हल्ला हे मुर्तीतंत उदाहरण आहे असल्याचे सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी भाजपा उमेदवार खा. डॉ. सुजय विखे यांच्यावर हल्ला चढविला. शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्यावर रविवारी दुपारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. ज्यांच्यावर हल्ला झाला आणि हल्ला करणारे दोन्ही गट भाजपा उमेदवार  डॉ.सुजय विखे यांचे समर्थक आहेत.

सचिन जाधव यांच्यावर हल्ला करण्याबरोबरच त्यांच्या संपर्क कार्यालयाचीही मोठया प्रमाणावर तोडफोड करण्यात आली . जाधव यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या वाहनांचीही मोठया प्रमाणावर तोडफोड करण्यात आली असून या घटनेच्या पार्श्‍वभुमीवर जाधव यांच्या कार्यायाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, नगरसेवक सचिन जाधव यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना नगरच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या डोके तसेच नाकास मार लागल्याची माहीती वैद्यकिय सुत्रांकडून देण्यात आली.

दरम्यान, या घटनेची माहीती मिळाल्यानंतर महविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जाधव यांच्यावर ज्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत तिथे जात त्यांच्या प्रकृतीची त्यांनी चौकशी करत त्यांना धिरही दिला.

जाधव यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना लंके म्हणाले, नगर शहरवासीयांकडून मला विकासाच्या मागणीचे अपेक्षा होती, मात्र लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या निमित्ताने नगर शहरवासीय माझ्याकडे संरक्षणाची मागणी करत होते. अनिल भैय्यांनी भयमुक्त नगरचा नारा दिला होता. त्यांच्या पश्‍चात आजही एका नगरसेवकावर हल्ला झाला आहे हे दुर्देव असून नगर शहरास भयमुक्त करणे अत्यावष्यक असल्याचे लंके म्हणाले.

लंके पुढे म्हणाले , निवडणूक प्रचाराच्या कालखंडामध्ये आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला . काही डमी लोकांना रूग्णालयात दाखल करून आमच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, मात्र सत्य हे झाकत नाही . संबंधित व्यक्तींनी त्या घटनांशी नीलेश लंके यांचा काहीही सबंध नसल्याचा खुलासा केला आहे . आज मात्र सत्याची बाजू समोर आली आहे. खरी गुंडा गर्दी कोणाची आहे हे आज जनतेसमोर आले असल्याचे लंके म्हणाले . लंके पुढे म्हणाले , एक नगरसेवक त्याच्या प्रभागातील १० ते २० हजार लोकांचे प्रतिनिधीत्व करतो .

त्या नगरसेवकास त्याच्या कार्यालयात जाऊन मारहाण होते हे पाहता नगर शहरात किती दहशतीचे वातावरण आहे याची प्रचिती येते. मी प्रशासनाकडे मागणी करतो की ही घटना कशामुळे घडली ? त्याचा शोध घेउन दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. या घटनेला पाठीशी न घालता ज्या नगरसेवकास मारहाण झाली आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. दोघांमधील वाद वैयक्तीक वाद असो किंवा काहीही असो इतक्या टोकाला जाणे साफ चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवाशी खेळ केला जात असेल तर हा दहशतवाद थांबला पाहिजे अशी मागणी आ. नीलेश लंके यांनी यावेळी बोलताना केली.

विखे यांचा रडीचा डाव

डमी तक्रारदार उभे करून. नीलेश लंके
गुंडगिरी करतो हे भासविण्याचा विखे यांनी निवडणूकीदरम्यान दोनदा प्रयत्न केला. मात्र तक्रारदारांनी त्यांची भुमीका मांडल्यानंतर खरे सत्य समोर आले आणि रडीचा डाव कोण खेळोतोय हे नगरकरांनी पाहिले. आजची घटना पाहिली तर खरी गुंडगिरी कोणाची याचे सत्य जनतेपुढे आले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!