नीलेश लंके सकाळीच जॉगिंग ट्रॅकवर!

- Advertisement -

नीलेश लंके सकाळीच जॉगिंग ट्रॅकवर!

विविध ठिकाणी नागरीकांच्या घेतल्या भेटी

नागरीकांकडून लंके यांना प्रतिसाद

नगर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश ज्ञानदेव लंके यांनी शुक्रवारी शहरातील विविध जॉगिंग ट्रॅकला भेटी देत नागरीकांशी संवाद साधला. नागरीकांकडून त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
सकाळी सहा वाजता लंके यांचा दौरा सुरू झाल्यानंतर नागरीक त्यांच्याजवळ आपुलकीने जात होते. शुभेच्छा देत होते. होणारे खासदार साधे असल्याची प्रतिक्रीया एका महिलेने दिली. तर भल्या सकाळीच फिरण्यासाठी आलेल्या छोटया मुलाने नीलेश लंके आले, त्यांचे चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस ही असल्याचे सांगितले. आम्हाला त्यांनी शिवपुत्र संभाजी हे नाटक दाखविल्याची आठवणही चिमुरडयाने करून दिली. लंके हे वाडीयापार्कवर पोहचले असता तिथे क्रिकेट खेळणाऱ्या तरूणांमध्ये ते सहजपणे मिसळले. हातात बॅट घेऊन क्रिकेट खेळण्याचा आनंदही त्यांनी लुटला.
पालघर येथे नोकरीनिमित्त असलेले दैठणे गुंजाळ येथील गृहस्थही सकाळी फिरण्यासाठी आले होते. माझ्याकडील नगर पासिंगची गाडी पाहिल्यानंतर ढवळपुरी येथील रहिवासी असलेल्या लंके यांच्या समर्थकाने माझी आस्थेने चौकशी केली. इथे काही अडचण आली तर मला कधीही सांगा नीलेश लंके साहेबांचे ५०० कार्यकर्ते जमा होतील. पालघर येथे नीलेश लंके प्रतिष्ठाणचे कार्यालय आहे. हा लंके साहेबांचा मोठेपणा आहे. लंके साहेबांची मला फार मदत झालेली आहे. मी नोकरदार माणूस आहे. राजकारणाशी माझा संबंध नाही तरीही लंके साहेबांचा परोपकार महत्वपुर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
▪️चौकट
कोरोना काळात बापाच्या मयतीला लोक जात नव्हते
नीलेश लंके यांनी शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर सुरू करून हजारो नागरीकांना जीवदान दिले. कोरोना काळात बापाच्या मयतीला लोक गेले नाहीत. नीलेश लंके हे मात्र आरोग्य मंदिरातच झोपून कोरोना रूग्णांची सेवा करीत होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे त्यांना पाठबळ असल्याची प्रतिक्रीया वयोवृध्द नागरीकाने दिली.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!