नूतन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिली पवार यांचे वाहतुक सेनेच्यावतीने स्वागत

0
99

अहमदनगर प्रतिनिधी – नगर शहर वाहतुक सेनेच्यावतीने  नूतन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांचे स्वागत शहरप्रमुख संजय आव्हाड यांनी केले. समवेत कार्यालयीन अधिक्षक रशिद शेख आदि उपस्थित होते.

याप्रसंगी अध्यक्ष संजय आव्हाड म्हणाले,गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी वाहतुक करणार्‍या स्कूलबस चालकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत.अशा परिस्थितीत शासनाकडून मदत मिळवी, स्कूल बसेसचे टॅक्सेस माफ व्हाव्यात, यासाठी परिवहन मंत्री यांना निवेदनही देण्यात आले.

परंतु कोणत्याही प्रकारची मदत या स्कूल बस चालकांना झालेली नाही.आता लवकरच शाळा सुरु होणार असल्याने स्कूल बसही सुरु होतील. तेव्हा आरटीओ कार्यालयाकडून नेहमीप्रमाणे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी उर्मिला पवार म्हणाल्या, अहमदनगर जिल्हा हा राज्यातील मध्यवर्ती जिल्हा असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक या ठिकाणाहून होत असते. वाहतुक व्यवस्था व्यवस्थीत ठेवण्याबरोबरच वाहतुकदारांच्या प्रश्न समजावून घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करु.

स्कूलबस चालकांचे प्रश्नांबाबतही आपण सहानभुतीपूर्वक विचार करुन ते सोडविण्याचा प्रयत्न करु.आरटीओ कार्यालय व संघटनेच्यावतीने जनजागृती उपक्रम राबवू, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here