नेत्रदुत जालिंदर बोरुडे यांचा गौरव…

0
74

निस्वार्थ समाजसेवेचे जालिंदर बोरुडे यांचे कार्य कौतुकास्पद- संजय गाते

 

अहमदनगर प्रतिनिधी – अमोल भांबरकर
गेल्या 35 वर्षापासून नेत्रदुत जालिंदर बोरुडे निस्वार्थपणे समाजसेवेचे कार्य करीत आहेत.बोरुडे यांनी नागरदेवळे सह जिल्हाभर मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून तीन लाख लोकांच्या मोफत शस्त्रक्रिया मोफत करून विक्रम केला आहे.अनेक वृद्ध माता पितांना अंधत्व निवारण करून आधार बनले आहेत.जालिंदर बोरुडे यांचे सामाजिक कार्य मोलाचे आहे.असे प्रतिपादन भाजपा ओबीसी प्रदेश आघाडीचे अध्यक्ष संजय गाते यांनी केले आहे.
दिल्लीगेट येथील शमी गणपती कार्यालयात ओबीसी मेळाव्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांच्या कार्याची दखल घेऊन विशेष सत्कार भाजपा ओबीसी प्रदेश आघाडीचे अध्यक्ष संजय गाते यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, विधानसभा प्रभारी महेंद्र गंधे, प्रदेश सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर,प्रदेश उपाध्यक्ष विनोद दळवी,शहर ओबीसी आघाडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे,शहर चिटणीस तुषार पोटे,राज्य कार्यकारणी सदस्य युवराज पोटे, नगरसेवक प्रदीप परदेशी,धनंजय जाधव,संतोष रायकर,अनुराज आगरकर,ओबीसी महिला अध्यक्षा रेखा विधाते,बाळासाहेब भुजबळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here