अहमदनगर प्रतिनिधी – अमोल भांबरकर
शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना पदाधिकारी मेळावा पार पडला.यावेळी मा.ना.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विनायक बेल्हेकर यांना नेप्ती युवासेना प्रमुख पदाचे पत्र देण्यात आले.
यावेळी युवासेना नगर तालुका प्रमुख प्रवीण गोरे, शिवसेना नगर तालुका प्रमुख राजू भगत, उप तालुका प्रमुख प्रकाश कुलट,माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम,नेप्ती शिवसेना शाखा प्रमुख बबन फुले,शिवसेना नगर प्रमुख जालिंदर शिंदे,उपशाखा प्रमुख बाळासाहेब बेल्हेकर,जय जाधव,सचिन मोरे, ओंकार बेल्हेकर आदी उपस्तीथ होते.
विनायक बेल्हेकर म्हणाले की, हिंदु ह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने व आर्शिवादाने हिंदुत्वाचे काम करण्याची संधी मिळाली.हे मी माझे भाग्य समजतो.
तसेच मा.मुख्यमंञी मा.ऊध्दवजी ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख व पर्यावरण मंञी आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शना नुसार संघटनेत कार्य करिल.तसेच युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहणार असल्याचे सांगितले.