नेवाशाच्या मुजोर आगार व्यवस्थापकावर कारवाई करा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नेवासा (प्रतिनिधी) – कर्मचारी आणि प्रवाशांची नाहक अडवणूक करणाऱ्या नेवासा आगार व्यवस्थापकावर नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्याची मागणी केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रभारी तसेच महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेसच्या एस.सी. विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड यांनी लेखी निवेदनाद्वारे राज्याच्या परिवहन मंत्र्यांकडे केली असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत परिवहन मंत्री ना. अनिल परब तसेच परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांना पाठवलेल्या निवेदनात गायकवाड यांनी म्हटले आहे की, नेवासा आगाराच्या व्यवस्थापकपदी हजर असलेले विद्यमान आगार व्यवस्थापक हे अतिशय निगरगट्ट व मुजोर असून एस.टी. कर्मचाऱ्यांबरोबरच प्रवाशांना देखील त्यांच्या मनमानी कारभाराचा त्रास सहन करावा लागत आहे.

नेवासा डेपो मध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या एस.टी. गाड्या तासंतास तिष्ठत थांबत असल्याचे नेहमीचे चित्र असल्याकडे त्यांनी परिवहन मंत्र्यांचे लक्ष वेधून या ठिकाणी प्रवाशांसाठी स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय बिकट झालेली असून ते दुरुस्त देखील करण्याकडे आगार व्यवस्थापकांचे लक्ष नाही. पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था नसून पिण्याच्या पाण्याची टाकी अत्यंत गलिच्छ असून यामध्ये मोठ्या प्रकारचे जंत आढळून आलेले आहेत.

आगार व्यवस्थापकांच्या ही बाब कर्मचाऱ्यांसह प्रवाशांनी लक्षात आणून देऊनही सदर आगार व्यवस्थापक महाशय कुठल्याही प्रकारची दखल घेत नसून प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. नुसता प्रवाशांच्या जीवाशी नाहीतर जे कर्मचारी रात्रंदिवस लाल परी जगवतात चालवतात त्यांच्याबाबतीत देखील हे महाशय अतिशय बेजबाबदारपणे वागत असतात अनेक वेळा अनेक कर्मचाऱ्यांचे यांच्याविषयीच्या गंभीर तक्रारी देखील आहेत.

कर्मचाऱ्यांच्या देखील ड्युटी चार्ट मध्ये आगार व्यवस्थापक भेदभाव करत असल्याचे निदर्शनास आल्याचे नमूद करुन कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विश्रामगृहाचीही अत्यंत बिकट अवस्था झालेली असल्याने कर्मचाऱ्यांना विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना अक्षरशः झाडाखाली विश्रांती घ्यावी लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

यामुळे महिला कर्मचाऱ्यांची देखील अतिशय कुचंबणा होत असून या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छता गृह नाही, तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखील विश्रांतीसाठी कुठल्याच प्रकारची या ठिकाणी सुविधा नसून हे आगार व्यवस्थापक महाशय काय करतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर केंद्रीय पत्रकार संघ, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस, अहमदनगर जिल्हा काँग्रेस, एससी विभाग तीव्र आंदोलन करेल असा गर्भित इशारा गायकवाड यांनी दिला आहे.

निधी जातो कुठे? 

शासनाने लाखो रुपये खर्चून नेवासा आगारात कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती गृह, स्वच्छता गृह तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाकीची व्यवस्था करून दिलेली आहे. परंतु अनेक वर्षापासून दुरुस्ती अभावी याची दयनीय अवस्था झाली आहे. याच्या दुरुस्तीसाठी येणारा निधी जातो तरी कुठे असा कळीचा मुद्दा कमलेश गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!