नेवासा तहसील घोटाळ्यातील आरोपी अखेर जेरबंद

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नेवासा (विशेष प्रतिनिधी) – नेवासा तहसील अंतर्गत नैसर्गिक आपत्ती घोटाळ्यातील आरोपीस जेरबंद करण्यात नेवासा पोलीसांना यश आले असून त्याला शनिवारी न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.दरम्यान,तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत आरोपीकडून संवेदनशील माहिती बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नैसर्गिक आपत्ती मदत निधीच्या चेकवर खाडाखोड करुन १६ लाख १४ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीसांनी अविनाश चंद्रभान हिवाळे (रा.देडगांव) या कोतवालाविरोधात भादवि कलम 408, 409, 420, 465, 467, 468, 471, 473, 477 (अ), 484 अन्वये गुन्हा दाखल केला.मात्र दरम्यानच्या काळात आरोपीने त्याच्यावर ठपका ठेवण्यात आलेली रक्कम दोन-तीन टप्प्यात भरल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच पलायन केल्याचे सांगण्यात येते.

नेवासा पोलीसांनी आरोपीचा ठावठिकाणा काढण्यासाठी खबऱ्यांचे जाळे कार्यान्वीत केले. नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी गुप्त बातमीदाराकडून सदर आरोपी मुंबईत असल्याचे समजल्यावरुन त्यांनी पोलीस नाईक राहुल यादव,शाम गुंजाळ,जयंत तोडमल यांना निर्देश देऊन आरोपीस जेरबंद करुन आणण्यासाठी मुंबईला रवाना केल्याचे सांगण्यात येते.सदर पोलीस पथक आरोपीस मुंबईतून ताब्यात घेऊन नेवाशात आल्यानंतर कायदेशीर सोपस्कार आटोपून त्याला नेवासा न्यायालयासमोर उभे केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

गुन्हा नोंदविल्याला मोठा कालावधी उलटून जाऊनही आरोपी पोलीसांच्या ताब्यात येत नसल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. शासकीय निधीच्या अपहाराचे प्रकरण असल्याने साधा कोतवाल दर्जाचा व्यक्ती एकटा इतके मोठे धाडस करु शकतो? याबाबत जाणकारांत संभ्रम आहे.आरोपी ताब्यात आल्यानंतर त्याला पोलीस कोठडीच्या कालावधीत त्याच्याकडून खरी माहिती उघड होण्याचा अंदाज आहे.या गुन्ह्यात त्याला आणखी कोणाची साथ आहे किंवा त्याच्यासह आणखी कोण कोण यात सामिल आहे,याचा खुलासा होऊ शकतो.

योगायोगाने नेवासा पोलीस ठाण्यात अनुभवी तसेच कर्तव्यदक्ष समजल्या जाणाऱ्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय करे यांची नेमणूक असून या गुन्ह्याचा तपासही त्यांच्याकडेच असल्याने पोलीस कोठडीच्या काळात ते आरोपीकडून ‘सत्य’ वदवून घेतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!