नेवासा फाटा येथील रस्ता दुभाजक धोकादायक;अपघातांची मालिका अद्यापही सुरूच.

0
160

कंत्राटी अधिकाऱ्यांना जाग कधी येणार? राजेंद्र वाघमारे

नेवासा फाटा(प्रतिनिधी)

नेवासा फाटा परिसरात के. टी. कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीने दोन महिन्यांपूर्वी नेवासा फाटा येथे निरज फिष मर्चंट ते स्टेट बँक ऑफ इंडिया या दीड किलोमीटर अंतरावर इथे रस्ता दुभाजक बांधले,पण तेव्हापासून अपघातांची मालिका मात्र कमी न होता वाढतच आहे. अरुंद रस्ता त्यातच गजबजलेल्या ठिकाण आणि त्यामध्ये रस्ता दुभाजक अशा परिस्थितीमध्ये नेवासा फाटा परिसरामध्ये ट्राफिक जास्त प्रमाणात जाम होत असून ऐन वेळेस रुग्णवाहिकेला देखील रस्ता राहत नाही. त्यामुळे हे रस्ता दुभाजक लवकरात लवकर काढून रस्ता पूर्णपणे मोकळा करावा.

राजमुद्रा चौकात तर सतत रात्रीच्या वेळी डिव्हायडर लक्षात येत नसल्याने अनेक वाहनचालकांकडून अपघात घडत आहेत.अनेकवेळा या रस्ता दुभाजकाला स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोधही केला होता, परंतु कंत्राटी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या असताना देखील रस्ता दुभाजकाचे काम पूर्ण केले गेले.आधीच दोन्ही बाजूला अरुंद रस्ता मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूला असणारी दुकानांची पार्किंग आणि त्यात उभे केलेले रस्ता दुभाजक.यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी आता रास्ता रोकोचा संतप्त पवित्रा घेतला आहे.

तसे निवेदन इंदिरा कॉंग्रेसचे एस सी विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे ,कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड,सचिन बोर्डे ,सिनेअभिनेते चंद्रशेखर कडू यांनी खडका फाटा येथील के टी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचा टोलनाका येथे जाऊन व्यवस्थापक विलासराव देसले यांना दिले.

यावेळी तुषार शेंडगे,अभिजीत शेंडगे आणि कुणाल ससे हे उपस्थित होते.

“तत्काळ रस्ता दुभाजक हटवा – वाघमारे

नेवासा फाटा हे रहदारी च्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे या ठिकाणाहूनच श्री शेत्र शनिशिंगणापूर, श्री क्षेत्र शिर्डी, श्रीक्षेत्र देवगड, अशा धार्मिक स्थळांना या ठिकाणाहूनच जावे लागते त्यामुळे या ठिकाणी रहदारी मोठ्या प्रमाणात असून रस्ता दुभाजक टाकल्यामुळे अनेक अपघात या रस्त्यावर होत असून तासन्तास प्रवाशांना याठिकाणी अडखळून पडावे लागत आहे याची दखल लवकरात लवकर घेऊन हे दुभाजक काढून टाकावा अन्यथा काँग्रेस कमिटी एससी विभागाच्यावतीने टोल नाका बंद करू असा इशारा जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी दिला.

येणार्या आठ दिवसांत कंत्राटदार कंपनीने ऐकले नाही तर आत्तापर्यंत नुकसानग्रस्त झालेल्या वाहनांचा खर्च कंपनीकडून वसूल केला जाईल.
श्री चंद्रशेखर कडू पाटील (कला आणि सांस्कृतिक विभाग) तालुकाध्यक्ष ,नेवासा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here