पिसलेल्या समाजाला न्याय देण्यासाठी हातात हात घालून पत्रकारांनी काम करावे – ना.शंकरराव गडाख
नेवासा फाटा (प्रतिनिधी) – नेवासा येथे “आम्ही नेवासकर” ग्रुपच्या वतीने सर्व पत्रकारांना एकत्रित करुन पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
नेवासा तालुक्याला पत्रकारितेची मोठी परंपरा असूनदिनमित्रकार स्वर्गीय मुकुंदराव पाटील यांनी चुकीच्या रूढी परंपरेच्या विरोधात जशी आपली लेखणी चालविली तीच चालत आलेली निर्भीड पत्रकारितेची परंपरा देखील सर्व पत्रकारांनी चालवावी व पिसलेल्या समाजाला न्याय देण्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करावे असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री व नेवासा तालुक्याचे लोकप्रतिनिधी नामदार शंकरराव गडाख यांनी केले.
नेवासा येथील औदुंबर चौकात असलेल्या हॉटेल प्रणाम सभागृहात “आम्ही नेवासकर ग्रुप”च्या वतीने सर्व पत्रकारांना एकत्रित करून आयोजित केलेल्या पत्रकार दिन कार्यक्रमात नामदार शंकरराव गडाख हे बोलत होते.
जेष्ठ पत्रकार अशोकराव डहाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.या पत्रकार दिन कार्यक्रमाला पुणतांबा शिंगवे येथील साई आश्रमाचे प्रमुख महंत साईनारायण महाराज,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ देसरडा,नगराध्यक्ष सतीशराव पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप,नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे,शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार,नेवासा तालुका नेवासा एकता पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व नेवासा प्रेस क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मोहन गायकवाड,मकरंद देशपांडे,ग्रामिण पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकरराव नाबदे,प्रेस क्लब नेवासाफाटा अध्यक्ष संदीप गाडेकर,केंद्रीय पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष कमलेश गायकवाड,आम्ही नेवासकर ग्रुपचे प्रमुख अभिषेक गाडेकर,सौरभ मुनोत,नगरसेवक दिनेश व्यवहारे, रणजित सोनवणे,राजेंद्र मापारी,शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन जगताप,काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजनदादा जाधव यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी नामदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून पत्रकार दिन व त्यानिमित्ताने चालत आलेली पत्रकारितेतील परंपरा प्रास्ताविकात भाषणात बोलताना विषद केली.
यावेळी नामदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते पत्रकार सौरभ मुनोत व पत्रकार अभिषेक गाडेकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या “आम्ही नेवासकर”या न्यूज अँपचे उदघाटन लॅपटॉपचा कळ दाबून करण्यात आले.
यावेळी नामदार शंकरराव गडाख व उपस्थित मान्यवरांना भगवतगीता ग्रंथ व बुके देऊन सन्मानित करण्यात आले तर नेवासा तालुक्यातून आलेल्या पत्रकारांचा सन्मान नामदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते लेखणी,मोबाईल हेडफोन,डायरी व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी बोलतांना नामदार शंकरराव गडाख म्हणाले की पत्रकारितेची मोठी परंपरा नेवासा तालुक्याला आहे दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांनी ब्रिटिश राजवटीसह राजेशाही राजवटीच्या काळात चुकीच्या रूढी परंपरेच्या विरोधात आवाज उठविला,तीच परंपरा सर्व पत्रकारांनी चालू ठेवावी,पत्रकारांकडे डोळसपणे समाज पहातो. कारण तो समाजाच्या जडणघडणीतील महत्वाचा घटक आहे समाज उभारणीत ही पत्रकारांचे मोठे योगदान असून माझ्यासह आपण देखील समाज उभारणीसाठी काम करत आहात.त्यामुळे तुमचे आमचे काम सारखेच आहे,पिसलेल्या समाजाला न्याय देण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मान अपमान बाजूला ठेऊन सर्वांनी हातात हात घालून मोकळेपणाने काम करूया असे आवाहन करून त्यांनी पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी झालेल्या पत्रकार दिन कार्यक्रमाला भाजपचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ देसरडा यांनी भेट दिली.
यावेळी त्यांचा पत्रकारांच्या वतीने सन्मान करण्यात आला.समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांचे मोठे योगदान असल्याने पत्रकारांनी सर्व घटकांची बाजू समजावून घेऊन ती बाजू समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन करून पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.देविदास साळुंके व पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर जेष्ठ पत्रकार बाळकृष्ण पुरोहित यांनी उपस्थित पत्रकार,नगरसेवक, विविध संस्थेचे पदाधिकारी विविध पक्षाचे पदाधिकारी यांचे आभार मानले.यावेळी आम्ही नेवासकर ग्रुपच्या वतीने उपस्थित पत्रकारांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.
गुरुवर्य भास्करगिरी बाबांचे पत्रकार दिनी व्हिडिओद्वारे संदेश…👇
पत्रकार दिनाच्या निमित्ताने श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी ऑनलाईन व्हिडीओ क्लिप द्वारे पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या पत्रकारांचे समाजाच्या जडणघडणीत मोठे योगदान असून काही वेळेस त्यांना कठीण प्रसंगाला देखील सामोरे जावे लागते ज्या जेष्ठ पत्रकारांनी आपली लेखणी समाजाच्या उत्कर्षासाठी झिजविली त्या पत्रकारांना मानधन कसे मिळेल यासाठी शासनाने विचार करावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.