नोकरीचे आमिष दाखवून शेतकरी कुटुंबाला पाच लाखाचा गंडा
पोलीस अधीक्षक यांनी ४२० चा गुन्हा दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाला जामखेड पोलीस स्टेशनचे निरीक्षक व कॉन्स्टेबल यांनी दाखवली केराची टोपली
पाच लाखाचा गंडा घालणाऱ्या आरोपींला पोलीस पाठीशी घालत असल्याने शेतकरी शिंदे कुटुंबीयाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
अहमदनगर (प्रतिनिधी) – जामखेड येथील सदाफुले वस्ती येथे राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील अलका नामदेव शिंदे हे असून यांच्या मुलाला नोकरीला लावून देतो म्हणून पाच लाखाची फसवणूक केलेल्या आरोपींवर ४२० चा गुन्हा दाखल करण्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश दिले असता देखील जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र सरोदे यांनी आदेशाला केराची टोपी दाखून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने शिंदे कुटुंबीयांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले यावेळी अलका शिंदे, विठ्ठल कदम, हिम्मत शिंदे, रंजना शिंदे आदी.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, उपोषण करते अलका नामदेव शिंदे, पती विठ्ठल किसन कदम व मुलगा सौरभ विठ्ठल कदम आम्ही एकत्र राहत असून मुलगा सौरभ कदम याचे पदवीधर शिक्षण झाले असून तो जामखेड येथील ग्रामीण रुग्णालय येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्या ठिकाणी फसवणूक करणारे अण्णासाहेब उर्फ श्रीकृष्ण आदिनाथ सावंत, यासीन हुसेन शेख, विठ्ठल ज्ञानेश्वर सावंत हे म्हणाले की नोकरीचे कायमस्वरूपी चे काम करून देतो १५ लाख रुपये द्या सुरुवातीला ५ लाख रुपये द्या व नोकरीचे काम झाल्यावर उर्वरित १० लाख रुपये रक्कम द्या असे म्हणाले व आमची मंत्रालय मध्ये खूप ओळखी आहेत व मंत्र्यांचे आणि माझे संबंध खूप चांगले आहे मंत्र्यांचे पीए माझे मित्र असून आम्ही याच्या पहिले अनेक जणांना नोकरी दिलेली आहे त्याचप्रमाणे तुमचं काम करून देऊ व मुलगा सौरभ याने घरात कुठलीही कल्पना न देता आई-वडिलांना ५ लाख रुपये पाहिजे असा हट्ट धरून ५ लाख रुपये घरातून घेतले व विठ्ठल सावंत यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात आरटीजीएस ने पाठवले त्यानंतर घरच्यांनी विचारले असता पैसे काय केले सौरभने सांगितले की वरील तिघांनी मिळून माजी फसवणूक केली आहे.
त्यांनी मला नोकरीचे खोटे आमिष दाखवून माझ्याकडून ५ लाख घेऊन माझी फसवणूक केली आहे. त्यानंतर माझे पती व सौरभ या दोघांना अण्णासाहेब आदिनाथ सावंत यांच्या घरी पाठवले असता तुम्ही आमचे नोकरीचे काम केले नाही माझे ५ लाख रुपये घेतलेले परत द्या अशी पैशाची मागणी केली असता त्यावेळेस अण्णासाहेब सावंत हे शिंदे याच्या अंगावर मारण्यास धावून आले व त्या दोघाला शिवगाळ केली व सावंत म्हणाले की परत माझ्या दारात पैसे मागायला आल्यास तुम्हा दोघांना जिवंत ठेवणार नाही व तुम्हाला मी तुमचे ५ लाख परत देणार नाही काय करायचे ते करून घ्या तुमचे ५ लाख मी, विठ्ठल व यासीन यांनी वाटून घेतलेले आहे माझ्या जामखेडमध्ये मोठ मोठ्या लोकांसोबत ओळखी आहेत माझे सासरे व माझा मेहुना जामखेड न्यायालयामध्ये वकील आहेत माझे कोणीही काही करू शकत नाही असे म्हणाले व आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असता कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही व पोलीस अधीक्षकांची भेट घेतली त्यावेळेस पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन देखील गुन्हा दाखल होत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण चालू करण्यात आले आहे. वरील तिघांवर अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनात केली आहे.