न्युक्लिअस हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने कोविड योद्ध्यांचा सन्मान

0
103
न्युक्लिअस हॉस्पिटलचे कोरोना काळातील काम उल्लेखनीय :- आ.संग्राम जगताप
ग्रामीण भागातील डॉक्टरांनी नागरिकांन मध्ये लसीकरणासाठी जनजागृती करावी

अहमदनगर प्रतिनिधी – कोरोना संसर्ग विषाणूला थांबवायचे असेल तर लसीकरणा शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही अजूनही ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत समज-गैरसमज निर्माण झाले आहेत.अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रममाचे वातावरण पसरले आहे यामुळे नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढलेली दिसत आहे.

यासाठी ग्रामीण भागातील डॉक्टरांनी पुढाकार घेऊन नागरिकांमध्ये लसीकरणासाठी जनजागृती करावी तसेच नगर शहरातील न्युक्लिअस हॉस्पिटलने कोविड काळात चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल हॉस्पिटल बद्दल विश्वास निर्माण झाला आहे व त्यामुळे डॉक्टर व रुग्णांमध्ये ऋणानुबंध जोडले गेले आहे.डॉ. गोपाळ बहुरूपी यांनी या संकट काळात दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

नगर शहरातील न्यूक्लिअस हॉस्पिटलच्या वतीने कर्जत तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कोविड योद्धाचा सन्मान आमदार संग्राम जगताप व मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉ.गोपाळ बहुरूपी,डॉ.सुधीर बोरकर,चेतना बहुरूपी,कर्जत तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश तोडमल,कर्जत शहर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.भंडारी, मिरजगाव मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.पंढरीनाथ गोरे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले की,न्यूक्लिअस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी उपचारांबरोबरच रुग्णांना योग्य मार्गदर्शन केले आहे, सध्या वेगवेगळे आजार येत आहेत. डॉक्टरांनी व हॉस्पिटल मधील सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली आहे.विशेष म्हणजे उत्तम आरोग्य सुविधा दिली म्हणून डॉ.गोपाळ बहुरूपी यांची दखल देश पातळीवर घेण्यात आली आहे राज्यपालांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना डॉ.गोपाळ बहुरूपी म्हणाले की,कोविड संकट काळात रुग्णांची सेवा करणे अत्यंत कठीण होते,कोरोनाचा संकटकाळ हा कठीण व मनाला वेदना देणारा काळ होता परंतु आम्ही ‘रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हेच ध्येय’ मनाशी बाळगून कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार करु शकलो व रुग्ण आनंदाने आपल्या घरी परतले.

यापुढेही रुग्णसेवा अशीच चालू ठेवणार आहे तसेच न्युक्लिअस हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला रुग्णसेवा करताना महत्वपूर्ण सहकार्य केले,याच बरोबर कर्जत तालुक्यातील डॉक्टरांनी कोविड काळामध्ये यशस्वीपणे उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांचा आज सन्मान करण्यात आला असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here