पंकजाताई मुंडे यांचे राजकीय पुर्नवसनासाठी भगवान बाबांची महाआरती करुन सकल ओबीसी समाजातर्फे साकडं

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पंकजाताई मुंडे यांचे राजकीय पुर्नवसनासाठी भगवान बाबांची महाआरती करुन सकल ओबीसी समाजातर्फे साकडं

नगर – ओबीसी समाजाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या राजकीय पुर्नवसनासाठी अहिल्यानगर शहरातील ओबीसी समाज व मुंडे समर्थकांनी सावेडी उपनगरातील निर्मलनगर येथील भगवान बाबांच्या मंदिरात महाआरती करुन साकडे घातले.

यावेळी ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकल ओबीसी समाज हा पंकजाताईंना मानणारा आहे. त्यांचा पराभव सर्वांच्या जिव्हारी लागला आहे. त्यांचे लवकरात लवकर राजकीय पुर्नवसन करतांना राज्यसभेवर नियुक्ती करुन मंत्रीपद द्यावे, अशी एकमुखी मागणी भगवानबाबांच्या मंदिरात महाआरती प्रसंगी कार्यकर्त्यांनी केली.

भगवान बाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भिमराज आव्हाड म्हणाले, पंकजाताईंची लोकप्रियता, ओबीसी समाजासाठी त्यांचे कार्य पाहता निवडणूकीत निसटता पराभव झाला, तो इतका जिव्हारी लागला की कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रेमापोटी स्वत:ची जीवनयात्रा संपविली हे दु:खदायक आहे. कायकर्त्यांच्या आत्महत्याचे सत्र थांबविण्यासाठी त्यांचे लवकरात लवकर राजकीय पुनर्वसन करा, अशी मागणी केली.

ओबीसीचे कार्यकर्ते कैलास गर्जे म्हणाले, पंकजाताई यांच्या सन्मानासाठी भगवान बाबांना महाआरती करुन साकडे घातले. ताईंचे दरवेळेस खच्चीकरण केले जाते. पंकजाताईंचे पुर्नवर्सन झाले नाही तर ओबीसी समाज वेगळा विचार करुन पुढील निवडणुकीत ताकद दाखवून देईल, असा इशारा दिला.

यावेळी राहूल सांगळे, वैभव ढाकणे, नितीन शेलार, रमेश सानप, बंटी ढापसे, सुमित बटुळे, बबन नांगरे, भैय्या घुले, कुमार बांगर, अतुल गिते, सिताराम पालवे, मिठू गिते, शिरसाठ सर, आव्हाड सर तसेच सकल ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!