पंजाबी सनातन धर्मसभेच्या शहरातील राधा-कृष्ण मंदिरात घट स्थापना

0
85

नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवारी माता की चौकीचे आयोजन

 

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात विधीवत पुजा करुन उत्साहात घट स्थापना करण्यात आली.मंदिर भावीकांसाठी खुले झाले असताना कोरोना नियमांचे पालन करुन नवरात्र उत्सवानिमित्त राधा-कृष्ण मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांच्या हस्ते गुरुवारी (दि.७ ऑक्टोबर) सकाळी घट स्थापना झाली.पंडित महेंद्र शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विधीवत पूजा पार पडली.

यावेळी किरण विजन,डोला तलवार,जनक आहुजा, हरजितसिंह वधवा,अनिल सबलोक,अ‍ॅड.गौरव मिरीकर, सुनिल सहानी,अजय पंजाबी,सुभाष जग्गी,संजय आहुजा,गुलशन कंत्रोड,सतिंदर नारंग,विणू चड्डा,बंटी बिंद्रा,संजय धुप्पड, योगेश धुप्पड, विजय पंजाबी, प्रितपालसिंग धुप्पड,विरेंद्र ओबेरॉय,सौरभ पंजाबी आदिंसह भाविक उपस्थित होते.

गेल्या ५५ वर्षापासून मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना करुन विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. या वर्षी देखील मंदिरात कोरोना नियमाचे पालन करुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत किर्तन होणार आहे. तर दररोज संध्याकाळी ७ वाजता आरती होणार आहे.

नवरात्रनिमित्त मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून, मंगळवार दि.१२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता बल्लू सचदेव माता की चौकीचा कार्यक्रम होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांना तोंडाला मास्क व फिजीकल डिस्टन्स ठेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन भाविकांना करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here