पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्यावतीने महाआरती

0
90

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर- भैय्या गंधे

अहमदनगर प्रतिनिधी  –  गेल्या आठ वर्षांपासून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी देशाची पंतप्रधान म्हणून जागतिक स्तरावर मोठा प्रतिमा निर्माण केली आहे. जागतिक पातळीवर मोठा दबदबा निर्माण करुन देशाला स्वयंपुर्तीकडे नेले आहे. देशातील तळागाळातील लोकांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचविले आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रात देशाची प्रगती झाली नाही.असे सर्वसामान्यांचे नेतृत्व देशाला लाभले आहे. सध्या कोरोना काळातही केंद्र शासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना रोखू शकलो. जगात सर्वांत जास्त लोकांचे लसीकरण करुन देशाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल, असेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अशा नेत्यांला दिर्घाष्य लाभो व देशाची प्रगतीची घौडदौड अशीच सुरु रहावे, हीच श्री  विशाल गणेश चरणी प्रार्थना भैय्या गंधे यांनी केली.

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर जिल्हा भाजपाच्यावतीने शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे महाआरती करण्यात आली.

याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, ज्येष्ठ नेते  सुनिल रामदासी, सुवेंद्र गांधी, अ‍ॅड.विवेक नाईक, महेश तवले, तुषार पोटे, महेश नामदे, पंकज जहागिरदार, संजय ढोणे, प्रशांत मुथा, रविंद्र बारस्कर, अंजली वल्लाकट्टी, शिवाजी दहिंडे, संतोष गांधी, अजय चितळे, मनेष साठे, बाबासाहेब सानप, सुमित बटुळे, आशिष अनेचा, बाळासाहेब गायकवाड, सुबोध रसाळ, राजू मंगलाराप्, यश शर्मा, लिलावती अग्रवाल, साहिल शेख, सुधीर झरकर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाने देशातील जनतेला अभिमान वाटावा, अशी कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वात देशाची होत असलेली प्रगती हे महासत्तेकडे नेणारी आहे. सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी विविध योजना राबवून त्यांची उन्नत्ती साधली आहे. अशा नेत्याची देशाला पुढील काळातही गरज असून, देशाला प्रगतीपथावर नेणार्‍या नेत्यास दिर्घाष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

     याप्रसंगी सुनिल रामदासी, महेश तवले, सुवेंद्र गांधी आदिंनी मनोगतातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करुन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here