पक्ष्यांना वाचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भालसिंग यांचा पुढाकार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय

पक्ष्यांना वाचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भालसिंग यांचा पुढाकार

झाडाला टांगले धान्य व पाण्याची भांडी

अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात वाढलेले तापमान व पक्ष्यांना जगणे सुसह्य व्हावे म्हणून वाळकी (ता. नगर) गावात सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी झाडांवर पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भालसिंग गाव परिसरात ठिकठिकाणी हा उपक्रम राबवून पक्ष्यांचे जीव वाचविण्यासाठी सरसावले आहे.

दिवसं-दिवस उन्हाची तीव्रता वाढत असताना 38 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. पक्षी पाण्यासाठी व अन्नासाठी भटकंती करीत आहे.वाढत्या तापमानात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागत आहे. ही जाणीव ठेऊन विजय भालसिंग यांनी गावातील शेत परिसरात झाडांवर धान्य व पाण्याची भांडी टांगून पक्ष्यांची सोय केली आहे.

पक्षी हे नैसर्गिक चक्राचा घटक असून, त्यांना जगविणे ही मनुष्याची नैतिक जबाबदारी आहे. पक्षांना वाचवण्यासाठी सर्वांना जबाबदारी घ्यावी लागणार आहे. झाडावर, घराच्या गच्चीवर व गॅलरीत पक्ष्यांच्या पाण्याची व धान्याची व्यवस्था करण्याचे आवाहन भालसिंग यांनी केले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!