पत्रकार संजय सावंत यांना कोरोना योध्दा आदर्श पञकारिता पुरस्काराने गौरव

0
83

अहमदनगर प्रतिनिधी – अमोल भांबरकर

कोरोना महामारीच्या संकटकाळात अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेली जनजागृती व समाजातील लोकांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल पत्रकार संजय सावंत यांना स्वर्गीय पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था नगर यांच्या वतीने २०२१ चा “कोरोना योध्दा आदर्श पञकारिता पुरस्कार”देवुन सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

पञकार संजय सावंत यांनी कोरोना महामारीच्या संकटकाळात समाज जागृतीचे कार्य केले.तसेच विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपले योगदान दिल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.

नगर शहरात पञकारितेच्या माध्यमातुन अनेक शहरातील समस्या सोडविण्याचे काम केले आहे.गेल्या अनेक वर्षापासुन ते पञकारितेच्या क्षेञात उत्कृष्ट कार्य करित आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेवुन त्यांना स्वर्गीय पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था अहमदनगर यांच्या वतीने २०२१ चा “कोरोना योध्दा आदर्श पञकारिता” पुरस्काराने पारनेर मतदारसंघाचे आ.निलेश लंके यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

याप्रसंगी माधवराव लामखडे निमगाव वाघाचे सरपंच सौ. रुपालीताई जाधव,प्रा.डॉ. गुंफाताई कोकाटे,डॉ.दिलीप पवार,रामदास भोर,आबापाटील सोनवणे आदींच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक देण्यात आले.

सावंत यांना यापूर्वी विविध पुरस्कार मिळालेले आहेत.त्यांच्या कामाची दखल घेऊन हा पत्रकार पुरस्कार देण्यात आला आहे.संजय सावंत यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील विविध घटकांमधून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here