पदवी आणि पदयुत्तर शिक्षणाचा कर्णबधिर-मूकबधिरांचा मार्ग अनामप्रेम च्या माध्यमातून मोकळा

0
34

पेमराज सारडा महाविद्यालयाचा पुढाकार

 

अहमदनगर प्रतिनिधी – मूकबधिर-कर्णबधिर प्रवर्गातील मुला-मुलींचा पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. कोणतेच महाविद्यालय प्रवेश देत नाहीत. त्याला कारणे अनेक आहेत. सांकेतिक भाषेत शिकवणाऱ्या शिक्षकांची वानवा आहे. या प्रवर्गाला समजून घेण्याची मानसिकता दिसत नाही. पटसंख्या म्हणून या प्रवर्गाकडे पाहणारे शाळा,महाविद्यालय बहुतेक आहेत. काही महाविद्यालय याला नक्कीच अपवाद आहेत.

या अपवादात नगर शहरातील पेमराज सारडा महाविद्यालय आहे. आज महाविद्यालयाच्या विद्यमान प्राचार्या डॉ.माहेश्वरी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पदवी शिक्षणासाठी नगर तालुक्यातील गणेश जेधे या कर्णबधिर-मूकबधिर मुलाचा मोफत प्रवेश महाविद्यालयात आज करण्यात आला.

जेधे परिवारातील गणेश हा कर्णबधिर-मूकबधिर असल्याने त्याला 12 वी नंतर पुढे काय शिक्षण द्यायचे..?  हा  प्रश्न त्याच्या मजुरी करणाऱ्या आई-वडिलांसमोर होता. त्याला सरकारी नोकरी लावून त्याला कमवता करण्यासाठी अशिक्षित पालक धडपडत आहेत. त्याला पेमराज सारडा महाविद्यालयाने मोफत प्रवेश दिल्याने गणेश च्या पालकांच्या आशा गडद झाल्या आहेत.

कर्णबधिर-मूकबधिर यांच्या पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी आता अहमदनगर येथे पेमराज सारडा महाविद्यालयात प्रवेश सुरू झाले आहेत. या कर्णबधिर-मूकबधिर मुला-मुलींना मोफत प्रवेश दिला जाणार असून त्यांची निवासाची व्यवस्था अनामप्रेम संस्थेत केली जाणार आहे.

दिव्यांग यांनी शिकावे या संस्थेच्या ध्येय उद्दिष्टे नुसार अनामप्रेम दिव्यांग यांच्या संपूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करीत आहे. उच्च शिक्षण मिळाल्याने दर्जेदार सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरी  मिळवताना कर्णबधिर-मूकबधिर मुला-मुलींना या शिक्षणाचा अतिशय उपयोग होणार आहे.तरी महाराष्ट्र राज्यातील 12 वी उत्तीर्ण कर्णबधिर-मूकबधिर मुला-मुलींनी तातडीने सम्पर्क साधावा,असे आवाहन पेमराज सारडा महाविद्यालय व अनामप्रेम संस्थेने केले आहे.

मोफत प्रवेशासाठी सम्पर्क: 9011670123/ 9766259581/7776088575/
9011020174 व्हिडीओ कॉल द्वारे कर्णबधिर-मूकबधिर यांनी सम्पर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here